Indian 2 1st Promo Released Date Twitter
मनोरंजन बातम्या

Indian 2 Poster: कमल हसन यांच्या ‘इंडियन’चा २७ वर्षांनी सिक्वेल येणार, वाढदिवसाआधीच अभिनेता चाहत्यांना देणार गिफ्ट

Indian 2: कमल हासन आणि शंकर यांच्या ‘इंडियन २’ या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना ३ नोव्हेंबर २०२३ रोजी पाहायला मिळणार आहे.

Chetan Bodke

Indian 2 1st Promo Released Date

एस शंकर दिग्दर्शित ‘इंडियन’ हा तमिळ चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला होता. आता याच चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच निर्मात्यांनी चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला आहे. चित्रपटामध्ये अभिनेते कमल हासन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कमल हासन आणि शंकर यांच्या ‘इंडियन २’ या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना ३ नोव्हेंबर २०२३ रोजी पाहायला मिळणार आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये ‘इंडियन २’ची पहिली झलक ३ नोव्हेंबर २०२३ ला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या चाहत्यांना चित्रपटाबद्दलची प्रचंड उत्सुकता आहे. कमल हसन यांचा वाढदिवस ७ नोव्हेंबरला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त निर्माते चाहत्यांसोबत चित्रपटाची पहिली झलक शेअर करणार आहे.

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे तर, कमल हासन सेनापती आणि त्याचा मुलगा चंद्रू हे दोघेही दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील एक सैनिक भष्ट्राचाराविरोधात लढाईला उभा राहतो. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्याला आलेल्या अडचणी आणि त्याच्या संघर्षाची कथा आपल्याला चित्रपटामध्ये दाखवला. शेवटच्या सीनपर्यंत उत्कंठा वाढवणारी कथा आपल्याला ‘इंडियन २’मध्ये पाहायला मिळणार आहे. (Bollywood Actor)

अद्याप निर्मात्यांनी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख, टीझर किंवा ट्रेलरची तारीख जाहीर केलेली नाही. उदयनिधी स्टॅलिन आणि ए सुबास्करन यांनी ‘इंडियन २’ची निर्मिती केली आहे. तर एस. शंकर यांनीच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत कमल हासन यांच्यासोबत, नयनतारा, रकुल प्रीत सिंह, प्रिया भवानी शंकर आणि सिद्धार्थ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर या चित्रपटाला संगीत अनिरुद्ध रवीचंदरनेच दिले आहे. यापूर्वी अनिरुद्ध रवीचंदरने ‘जवान’ व ‘लिओ’सारख्या चित्रपटांना संगीत दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge Plan: जिओटीव्हीसह ७४९ रुपयांचा खास प्लॅन, OTT सबस्क्रिप्शन अन् बरंच काही...

Maharashtra Rain Live News : कोल्हापूरात मुसळधार पावसामुळे घराची भिंत पडून तिघे जखमी

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढवणार? ही आहेत ५ महत्त्वाची कारणे

Mahalaxmi Rajyog 2025: हरतालिकेनंतर 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; महालक्ष्मी राजयोगामुळे मिळणार धन-संपत्ती

Success Story: ९व्या वर्षी घरोघरी जाऊन पेपर विकले, परदेशातील नोकरी सोडली; भारतात येऊन USPC परीक्षा क्रॅक; IFS पी बालागुरुगन यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT