Kajol Maa Movie SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kajol Maa Movie : २ तिकिटांवर १ तिकीट फ्री; 'माँ'च्या यशासाठी अजय देवगणनं दिली तगडी ऑफर, शेवटची तारीख काय?

Maa Movie Advance Booking Offer : काजोलच्या 'माँ' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. अजय देवगणने एक भन्नाट ऑफर प्रेक्षकांना दिली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) सध्या तिचा आगामी चित्रपट 'माँ' मुळे चांगलीच चर्चेत आहे. 'माँ' (Maa Movie) चित्रपट 27 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग (Advance Booking Offer) सुरू झाले आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे. कारण चित्रपटात काजोल एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक हटके ऑफर देण्यात आली आहे. याची पोस्ट काजोलचा नवरा बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने केली आहे.

नेमकी ऑफर काय?

अजय देवगणने (Ajay Devgn) पोस्ट केलेल्या पोस्टरमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, 'माँ' चित्रपटाच्या 2 तिकिटांवर 1 तिकीट फ्री/ मोफत मिळणार आहे. या ऑफरचा 'माँ'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

अजय देवगण पोस्ट

अजय देवगणने या पोस्टला हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "चंद्रपूर के डर का मजा सबके साथ ही आएगा! 2 तिकिटे खरेदी करा आणि 1 विनामूल्य मिळवा...ॲडव्हान्स बुकिंग सुरू...लवकर करा ऑफर या शुक्रवारपर्यंत मर्यादित आहे." आता रिलीजच्या पहिल्या दिवसापासून 'माँ' बॉक्स ऑफिसवर कसा धुमाकूळ घालते हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

'माँ' चित्रपट

काजोलचा 'माँ' चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात एका आईच्या संघर्षाची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील कोजालचे शक्तिशाली रूप पाहून चाहते भारावून गेले आहेत. चित्रपटात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जगातले सर्वाच पहिले धान्य कोणते? जाणून घ्या रोचक माहिती

Lalbaug Visarjan 2025 : लालबाग राजाच्या विसर्जनाला विघ्न, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

Heart-Touching Video : बाप्पाला घरी घेऊन चला, पाण्यात सोडू नका, शिवण्याचा बाबाकडे हट्ट, व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Maharashtra Live News Update: पुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबल

Lalit Prabhakar : 'आरपार'नंतर ललित प्रभाकर हिंदी चित्रपटात झळकणार, सिनेमाचे नाव काय?

SCROLL FOR NEXT