Anjali Arora  Saam Tv
मनोरंजन बातम्या

'हिच्याकडे एवढा पैसा कुठून आला?','कच्चा बादाम'फेम Anjali Arora ने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर; VIDEO पाहून नेटिझन्सनी केलं ट्रोल

Anjali Arora Trolled: २४ वर्षांच्या अंजली अरोराने मुंबईमध्ये घर खरेदी केले आहे. आता ती दिल्लीवरून मुंबईमध्ये राहायला येणार आहे. अंजलीने नुकताच आपल्या कुटुंबासोबत नव्या घरामध्ये प्रवेश केला.

Priya More

Anjali Arora Buy New House In Mumbai:

'कच्चा बादाम' (Kacha Badam) या गाण्यावर रील्स तयार करून रातोरात स्टार झालेली अंजली अरोरा (Anjali Arora) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सोशल मीडिया सेंसेशन अंजली अरोरा आपल्या पर्सनल लाइफमुळे सर्वात जास्त चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अंजलीचा एमएमएस सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अजंली पुन्हा चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे अंजलीने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२४ वर्षांच्या अंजली अरोराने मुंबईमध्ये घर खरेदी केले आहे. आता ती दिल्लीवरून मुंबईमध्ये राहायला येणार आहे. अंजलीने नुकताच आपल्या कुटुंबासोबत नव्या घरामध्ये प्रवेश केला. गृहप्रवेशाच्या पूजाचे व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अंजलीचे आई-बाबा आणि कुटुंबातील इतर सदस्य दिसत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अंजलीचे नवीन घर खूपच आलिशान आहे. अंजलीने पिंक कलरचा ड्रेस घातला आहे. ती कुटुंबासोबत नव्या घरामध्ये पूजा करताना दिसत आहे. अंजली अरोराने नवं घर खरेदी केलं ही आनंदाची गोष्ट आहे. तिच्या चाहत्यांना याचा आनंद झाला खरा पण काही नेटिझन्सनी तिला ट्रोल केले आहे. 'इतक्या कमी वयात कठून ऐवढे पैसे कमावले की ऐवढं मोठं घर खरेदी केलं?', 'अंजलीकडे ऐवढे पैसे कुठून आले?', 'ही मॅडम काय नोकरी करते की हिने मुंबईमध्येत आलिशान घर घेतलं?', 'ही इतके पैसे कुठून कमावते?' अशाप्रकारचे सवाल नेटिझन्स तिला करत आहे.

दरम्यान, अंजली अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या हटके डान्स व्हिडिओंमुळे ती खूपच प्रसिद्ध झाली आहे. अंजलीची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर ती जबरदस्त फोटो आणि डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. यामुळे ती नेहमीच चर्चेत राहते. तिने अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. त्याचसोबत ती कंगना रनौतच्या 'लॉकअप'शो मध्ये सहभागी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पाऊस, शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान...

Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची चौकशी, ४ तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

Ex गर्लफ्रेंडसोबत मरायचा प्लान आखला, कारमध्ये बसून बॉम्बस्फोट केला, तरुण जिवंत जळाला अन्..;

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतील 'या' 5 टिकली डिझाईन्स; प्रत्येक महिलेने आजच ट्राय करा

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

SCROLL FOR NEXT