Actor Death  saam tv
मनोरंजन बातम्या

Actor Death : शूटिंगवरून परतताना अपघात; अभिनेत्याचा रुग्णालयात चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू, ५ डॉक्टरांविरोधात गुन्हा

Actor Dies Due To Improper Treatment : चुकीच्या उपचारांमुळे अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. ५ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शूटिंगवरून घरी जाताना अभिनेत्याचा अपघात झाला.

रुग्णालयात चुकीच्या उपचारांमुळे अभिनेत्याचा मृत्यू झाला.

अभिनेत्याच्या मृत्यूमुळे ५ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

चित्रपटसृष्टीत ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यूच्या १२ वर्षांनी गोवंडी, चेंबूर येथील दोन खासगी रुग्णालयांतील पाच डॉक्टरांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंदवण्यात आला. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

'सकाळ'च्या वृत्तानुसार, एप्रिल २०१४ मध्ये गोवंडीत राहणाऱ्या ५७ वर्षांच्या नसीमबानू शाह यांच्या मुलाचा सलमानचा हिंदी मालिकेच्या शूटिंगवरून परत येताना अपघात झाला होता. हा अपघात वसई येथे झाला होता. तेव्हा सलमानला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा स्थानिक डॉक्टरांनी त्याच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले असून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.

डॉक्टरांचा सल्ला एकूण सलमानच्या कुटुंबाने त्याला गोवंडीतील मिलेनियम रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवसांनी मात्र सलमानचा मृत्यू झाला. नसीमबानू यांनी केलेल्या आरोपानुसार, डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते की, सलमानच्या अपघाताबाबत पोलीसांना माहिती देऊ नये. सलमानवर शस्त्रक्रिया सुरू असताना तब्बल अर्धा तास रुग्णालयाची लाइट गेली होती. विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शस्त्रक्रियेनंतर सलमानची तब्येत आणखी बिघडली, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्या दिवशी सलमान बेशुद्ध पडला. तेव्हा त्याला साई रुग्णालयात हलविण्यात आले. तेव्हा उपचारांदरम्यान सलमानचा मृत्यू झाला. याच प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलेनियम हॉस्पिटलचे डॉ. नियाज अहमद खान, डॉ. इम्तियाज अहमद खान, डॉ. उमेश पिंपळे आणि साई ग्रुप ऑफ हॉस्पीटलचे डॉ. खालीद, डॉ. अमित शोभावत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे एका अभिनेत्याचा मृत्यू झाला.

सलमानच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्याच्या आईने या प्रकरणात दोषी डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. मात्र ही चौकशी खूप लांबली कारण आरोपी डॉक्टर आणि रुग्णालयांनी सलमानवरील उपचारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे दिली नव्हती. मात्र आता अनेक वर्षांनी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी जे. जे. रुग्णालयाचा अहवाल पोलीसांना मिळाला. त्याआधारे शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT