JR. NTR Saam TV
मनोरंजन बातम्या

JR. NTR: सुपरस्टार ज्युनियर एनटीआरला डॉक्टरांनी दिला बेड रेस्टचा सल्ला; अभिनेत्याला नेमकं काय झालं?

JR. NTR: तेलुगू अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या खांद्याला दुखापत झाली असून डॉक्टरांनी ६ ते ८ आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्याची टीम अधिकृत निवेदनाद्वारे चाहत्यांना माहिती दिली.

Shruti Vilas Kadam

JR. NTR: दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. अभिनेत्याच्या खांद्याला दुखापत झाली असून डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी ६ ते ८ आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ही माहिती ज्युनियर एनटीआरच्या टीमने अधिकृत निवेदनाद्वारे दिली असून, चाहत्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ज्युनियर एनटीआरच्या टीमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, "आज संध्याकाळी एनटीआर यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. डॉ. जे. मधुसूदन राव आणि डॉ. आर. ए. पुरमचंद्र तेजस्वी यांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना ६ ते ८ आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांच्या आरोग्याविषयीची माहिती वेळोवेळी दिली जाईल."

मात्र, एनटीआरला ही दुखापत नेमकी कशी झाली, याबाबत टीमने कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या तो दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या बहुचर्चित 'ड्रॅगन' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ही दुखापत चित्रपटाच्या सेटवर झाली की इतर कोणत्या कारणामुळे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, 'ड्रॅगन' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय आहे. या चित्रपटाची कथा १९६७ च्या पार्श्वभूमीवर आधारित असून अफूचा व्यापार आणि 'अफगाण ट्रेडिंग कंपनी' या संस्थेभोवती फिरते. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर 'लुगार' ही भूमिका करत आहे.

या चित्रपटात रुक्मिणी वसंत, अनिल कपूर, बीजू मेनन, गुरू सोमसुंदरम, आशुतोष राणा, खुशबू सुंदर, राजीव कनाकला आणि सिद्धांत गुप्ता यांसारखे अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. 'ड्रॅगन' चित्रपट ११ जून २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT