Jhund  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhund Teaser Released: बिग बींचीच्या ‘झुंड’चा टीझर प्रदर्शित; चित्रपट ४ मार्चला चित्रपटगृहात

याआधी हा चित्रपट 8 मे 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना वाढत्या संकटामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर हा चित्रपट येत्या ४ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी 'झुंड' (Jhund) या चित्रपाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बिग बी एका वेगळ्या आणि दमदार व्यक्तिरेखेत झळकणार आहे. हा चित्रपट येत्या ४ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये बिग बी हे लहान मुलांच्या टोळीसोबत दिसत आहेत.

झुंडमध्ये अमिताभ बच्चन फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जे रस्त्यावरील मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरित करतात आणि त्यांच्यासोबत एक टीम तयार करतात. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज हिरेमठ, राज हिरेमठ, नागराज, गार्गी कुलकर्णी, मीनू अरोरा आणि संदीप सिंग यांनी केली आहे.मराठी चित्रपटसृष्टीला ‘सैराट’, ‘फँड्री’ असे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. आता नागराज यांचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत. नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटाबाबच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाचा टीझर त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांची धमाकेदार एण्ट्री पाहायला मिळत आहे. याआधी हा चित्रपट 8 मे 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना वाढत्या संकटामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर हा चित्रपट येत्या ४ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT