Jhimma 3 saam tv
मनोरंजन बातम्या

'झिम्मा' चा खेळ पुन्हा रंगणार; सिद्धार्थ चांदेकर नव्या ट्रिपसाठी तयार, Jhimma 3 ची 'या' तारखेला होणार थिएटरमध्ये एन्ट्री

Jhimma 3 Release Date : प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या नवीन प्रोजेक्टची मोठी अपडेट समोर आली आहे. 'झिम्मा ३' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे.

Shreya Maskar

हेमंत ढोमेने वाढदिवसाला चाहत्यांना खास सरप्राइज दिले.

'झिम्मा ३' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे.

'झिम्मा ३' चित्रपटात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहे.

प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माता आणि अभिनेता हेमंत ढोमेचा काल (21 मार्च) वाढदिवस होता. हेमंतने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना धमाकेदार सरप्राइज दिले आहे. त्यांने आपल्या नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर करून चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. गेल्याकाही दिवसापासून हेमंत ढोमे 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला अवघ्या जगभरात भरपूर प्रेम मिळाले आहे. 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाच्या यशानंतर हेमंत ढोमे पुन्हा एकदा 'झिम्मा' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेमंत ढोमेने 'झिम्मा ३'चे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टमध्ये चित्रपटाचा हिरो सिद्धार्थ चांदेकर दिसत आहे. एका नवीन लोकेशन सोबत सिद्धार्थ ट्रिप प्लान करणार आहे. पोस्टमध्ये सिद्धार्थ चांदेकर एका समुद्रकिनारी डोक्याला हात लावून उभा असलेला पाहायला मिळत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक बॅग्स दिसत आहेत. 'झिम्मा ३' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन हेमंत ढोमे यांचे आहे. तर निर्मिती क्षिती जोगची आहे.

'झिम्मा ३'च्या नवीन पोस्टरला खूप खास कॅप्शन देण्यात आले आहे. यात असे लिहिलं की, "आपला आनंदाचा खेळ 'यावेळी तिसराच आहे'! झिम्मा ३" चित्रपटाच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्सचा, कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. 'झिम्मा ३' चित्रपट 1 जानेवारी 2027 ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. नवीन वर्षात पु्न्हा एकदा झिम्माचा खेळ रंगणार आहे. 'झिम्मा' च्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आहे. आता चाहते 'झिम्मा ३'ची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

'झिम्मा' फ्रेंचायझीचा तिसरा भाग देखील सुपरहिट होईल असा विश्वास प्रेक्षक दाखवत आहे. 'झिम्मा' 2021 ला थिएटरमध्ये रिलीज झाला होता आणि 'झिम्मा 2' चित्रपट 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दोन्ही चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली. चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. चित्रपटाची गाणी आजही सोशल मीडियावर गाजतात. चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. आता 'झिम्मा ३'मध्ये कोण कोण झळकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या नेर तालुक्यात उष्माघाताने ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

HSC Result 2026 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 'इतके' टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी

Heart blockage treatment: हार्ट ब्लॉकेजचा धोका वाढतोय? डॉक्टरांनी सांगितलं अँजिओप्लास्टी करण्याची गरज कधी भासते

Fish bone stuck in throat: घशामध्ये माशाचा काटा अडकल्यास काय कराल?

SCROLL FOR NEXT