Jennifer Lopez Viral Video  Insta
मनोरंजन बातम्या

Video : ५५ व्या वर्षी गायिकेचं स्टेजवर अश्लील कृत्य, पुरुषच नाही तर महिला डान्सर्सशीही केलं लिपलॉक; व्हिडीओ व्हायरल

Jennifer Lopez Viral Video : अमेरिकेच्या लास वेगासमध्ये अमेरिकन म्युझिक अवॉर्डस हा कार्यक्रम संपन्न झाला. या भव्य दिव्य कार्यक्रमातला गायिका जेनिफर लोपेझचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

अमेरिकेच्या लास वेगासमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात गायिका जेनिफर लोपेझने साऱ्याचे लक्ष वेधले. अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्स या कार्यक्रमातला लेनिफर जोपेझचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने स्टेजवर बॅकग्राउंड डान्सरर्सना किस केल्याचे पाहायला मिळते. लिपलॉक प्रकरणामुळे अमेरिकन गायिका चर्चेत आहेत.

५५ वर्षीय जेनिफर लोपेझने अमेरिकन म्युझिक अवॉर्डमध्ये सहा मिनिटांचा डान्स केला. यंदाच्या वर्षातल्या गाजलेल्या गाण्यांवर ती थिरकली. पण परफॉर्मन्सपेक्षाही तिने केलेल्या एका कृतीची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. तिने परफॉर्मन्सदरम्यान स्टेजवर असलेल्या डान्सर्सना किस केले. ही घटना कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आणि नंतर व्हायरल झाली.

जेनिफर लोपेझचा लिपलॉक व्हिडीओ फिल्मफेअरच्या अधिकृत सोशल मीडिया अकांउट्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये जेनिफर लोपेझ बॅकग्राउंड डान्सर्सना किस करत असल्याचे पाहायला मिळते. आश्चर्याची बाब म्हणजे यात महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश होता. म्हणजेच तिने पुरुष डान्सरसह महिला डान्सर्सना देखील किस केले.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जेनिफर लोपेझला काहीजण ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. कमेंट्स करत नेटकऱ्यांनी जेनिफरवर टीका केली आहे. प्रसिद्धीसाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी लोकांना असं काहीतरी करावंच लागतं, असे अनेकांनी म्हटले आहे. काहींनी जेनिफरच्या कृतीला विकृती देखील म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT