Jawan 7th Day Box Office Collection Saam tv
मनोरंजन बातम्या

Jawan 7th Day Collection: सलग तिसऱ्या दिवशी ‘जवान’ची कमाई घसरली, आतापर्यंत जमा केला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला...

Jawan Box Office Collection: सोमवारपासून अर्थात प्रदर्शनाच्या पाचव्या दिवसापासून चित्रपटाच्या कमाईचा आकडा फारच कमी होत आहे.

Chetan Bodke

Jawan 7th Day Box Office Collection

एकट्या भारतातच नाही तर, अवघ्या जगभरात शाहरुख खानच्या ‘जवान’ची प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. पहिल्या विकेंडला प्रचंड कमाई करणारा हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर सहसा फारसा चालताना दिसून येत नाही, प्रदर्शनाच्या दिवशी आणि विकेंडला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.

सोमवारपासून अर्थात प्रदर्शनाच्या पाचव्या दिवसापासून चित्रपटाच्या कमाईचा आकडा फारच कमी होत गेला. नुकताच चित्रपट ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी काही थिएटर्सचा चित्रपटाच्या कमाईचा आकडा शेअर केला आहे. चित्रपटाचा गेल्या पहिल्या दिवसापासूनचा आकडा कसा होता, हे शेअर केला आहे.

एकूणच चित्रपटाच्या कमाईवर बोलायचे झाले तर, चित्रपटाने पहिल्या काही दिवसांत कमाईचा चांगलाच आकडा गाठला आहे. पण सोमवारपासून चित्रपटाच्या कमाईचा आकडा कमी होताना, दिसत आहेत. जरीही असं असलं तरीही चित्रपटाने कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करुन चित्रपटाने इतिहास रचला होता. चित्रपटाने सोमवारी ३२. ९२ कोटी, मंगळवारी २६ कोटी, तर बुधवारी २३ कोटींच्या आसपास गल्ला जमावला आहे. चित्रपटाने एकूण ३६८ कोटींचा टप्पा गाठला आहे.

तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपॉलिस या थिएटरमधील कमाईवर त्यांनी भाष्य केलं आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने २९. ९६ कोटी, दुसऱ्या दिवशी २२. ७५ कोटी, शनिवारी ३२. ६७ कोटी, रविवारी ३३.८१ कोटी, सोमवारी १३.८५ कोटी, मंगळवारी ११.३१ कोटी तर बुधवारी अर्थात काल चित्रपटाने १०.१६ कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा जर असाच घसरता राहिला तर, लवकरच निर्मात्यांना बॉक्स ऑफिसवरुन आपला गाश्या गुंडाळावा लागेल अशी चर्चा होत आहे. (Bollywood Film)

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'जवान' ने रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच बुधवारी २३ कोटींच्या आसपासचा आकडा गाठला आहे. 'जवान'ने सात दिवसातली एकूण कमाई आता ३६८. ३८ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खानने केली आहे. चित्रपट ७ सप्टेंबरपासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून प्रमुख भूमिकेत शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ प्रदर्शित झाला आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shital Gore News : नगरमध्ये पोलिसाची दुकानदाराला मारहाण, विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलीस ठाण्यात मारहाण

Akola : शेतकर्‍याचा मोबाइल पडला विहिरीत, पट्ट्याने बोलावलं आपत्कालीन पथक, २२ तासांचे रेस्क्यू

Chocolate Chikoo Milkshake Recipe : प्या गारेगार चॉकलेट चिकू मिल्कशेक, मिळेल हॉटेलपेक्षा भारी चव

Maratha Scholarship: ७० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Karisma Kapoor : "करिश्मा कपूरला ३०००० कोटींमधील एक रूपयाही नकोय, पण..." ; अभिनेत्रीच्या वकिलाचा दावा

SCROLL FOR NEXT