Shah Rukh Khan Jawaan Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jawan Teaser: बाबो! शाहरूखने ‘जवान’साठी केलंय टक्कल, लूक पाहताच चाहत्यांनी विचारले भन्नाट प्रश्न, किंग खान म्हणाला...

Jawan Teaser Release Update: शाहरूखचा ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीझरची ओढ लागली आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan Ask SRK Session: शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपुर्वीच चित्रपटाटा टीझर प्रदर्शित झाला होता, त्यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली होती. प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यापासून प्रेक्षक चित्रपटासाठी फारच उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. शाहरूख नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. ट्वीटरच्या माध्यमातून शाहरूख नेहमीच चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. AskSRK च्या माध्यमातून शाहरूखला चाहते नेहमीच प्रश्न विचारत असतात.

२०२३ या वर्षी शाहरूखचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘पठान’नंतर शाहरूखचा ‘जवान’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ७ सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या टीझरची ओढ प्रेक्षकांना लागली आहे. शाहरुख खानने AskSRK या क्विझमध्ये चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना ‘जवान’ चा टीझर प्रदर्शनाच्या तयारीत असून लवकरच टीझर प्रदर्शित होईल असं सांगितलं. सध्या सोशल मीडियावर ‘जवान’ चित्रपट ट्रेंड करतोय.

सध्या सोशल मीडियावर शाहरूखचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. त्या व्हायरल फोटोत शाहरूखच्या डोक्यावरील केस नाहीत. तो त्या फोटोत टकला दिसतोय. एका सोशल मीडिया युजरने शेअर केलेल्या फोटोत दावा करण्यात आला की, हा शाहरुख खानच्या लुक टेस्टचा फोटो आहे. परंतू या आधी शाहरुख खान कोणत्याही चित्रपटात टक्कल पडलेला दिसला नाही. यामुळे सर्वांनाच शाहरूखच्या लूकची कमालीची उत्सुकता आहे. अद्याप अधिकृत रित्या शाहरूखच्या लूकची माहिती समोर आलेली नाही.

‘जवान’मध्ये शाहरूखसोबत विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सोबतच या चित्रपटात विजय चंद्रशेखर आणि दीपिका पदुकोण कॅमिओ भूमिका करत असल्याची चर्चा सुरू आहे. अनेकदा सोशल मीडियावर शूटिंग दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाआधीच चित्रपटाने २५० कोटींची कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक एटली कुमार यांच्या चित्रपटाचे ओटीटी अधिकार नेटफ्लिक्सने २५० कोटी रुपयांचे राईट्स विकत घेतले आहेत. शाहरूख ‘जवान’ नंतर ‘टायगर ३’ आणि ‘डंकी’मध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT