Abhishek- Aishwarya Bachchan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Abhishek- Aishwarya Marriage: अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न होऊ नये म्हणून या प्रसिद्ध अभिनेत्रीने कापली होती हाताची नस, नेमकं काय आहे प्रकरण?

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या यांच्या नात्याबाबत मागील अनेक महिन्यापासून चर्चा रंगल्या असताना आता पुन्हा अभिनेता अभिषेक बच्चन वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

Manasvi Choudhary

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांच्या नात्याबाबत मागील अनेक महिन्यापासून चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या घटस्फोट होणार असल्याचं बोललं जातं होतं.यावर अभिषेक बच्चनने प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याने आमच्या नात्यात सर्वकाही सुरळीत असल्याचे सांगितले होते. आता पुन्हा अभिनेता अभिषेक बच्चन वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

२००७ मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या लग्नबंधनात अडकले. लग्नाआधीपासूनच या दोघांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. या प्रसिद्ध कपलच्या लग्नात अनेक अडचणी आल्या होत्या. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असुनही यांच्या लग्नात फार कमी लोकांना आमत्रंण देण्यात आलं होतं. यामागचं कारणही तसचं आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या याचं लग्न होऊ नये म्हणून अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या हाताची नस कापली होती.

जान्हवीने अभिषेक बच्चनसाठी तिच्या हाताची नस कापली होती, तिने अभिषेक बच्चन आणि माझं लग्न झालं आहे. असा गंभीर आरोप केला होता. जान्हवीने, २००६ मध्ये अभिषेकने माझ्याशी गुपचूप लग्न केल्याचा दावा केला होता. इतकच नाहीतर, याबाबतची तक्रार जान्हवीने पोलिसांत देखील दाखल केली होती. परंतू कोणतेही पुरावे नसल्याने पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत. २००६ मध्ये उमराव जान चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर १४ जानेवारी २००७ मध्ये हे दोघेंही लग्नबंधनात अडकले. या दोघांनाही एक मुलगी आहे जिचं नाव आराध्या आहे. हे कुटुंब सोशल मीडियावर अनेकदा स्पॉट होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे भेट देणार

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT