Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : जान्हवीला मिळाला धोका! अरबाज अन् वैभवसोबतच्या मैत्रीत फूट, कोण आहे व्हिलन?

Janhvi Betrayal By Friends : कॅप्टनसी टास्कमुळे बिग बॉस घरात पुन्हा वादाला सुरूवात झाली आहे. या टास्क दरम्यान जान्हवीला मित्रांकडून धोका मिळाला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात प्रत्येक क्षणाला नेमकं काय घडते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. यंदाचा सीझन मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. घरातील सदस्यांनी अनेक वेळा भांडून घर डोक्यावर घेतलेले पाहायला मिळते. बिग बॉसने दिलेला टास्कमुळे नेहमी बिग बॉस घरात मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळते. नुकताच पार पडलेला कॅप्टनसी टास्कने नवीन वादाचा मुद्दा निमार्ण केला आहे.

कॅप्टनसी टास्कमध्ये जान्हवीला (Jahnavi Killekar) मोठा धक्का बसला आहे. तिच्याच मित्रांकडून तिचा विश्वासघात करण्यात आला आहे. 'बिग बॉस मराठी' च्या नव्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकाल की, जान्हवी अरबाज (Arbaz Patel) आणि वैभवला विचारतेय, "तुम्ही सेकंड राऊंड मधून मला कॅप्टनसीतून उडवलं?". त्यावर वैभव (Vaibhav Chavan) उत्तर देत म्हणतोय,"निक्कीने तुला काढलं आहे". पुढे जान्हवी विचारते,"निक्कीला (Nikki Tamboli) माझ्या कॅप्टनसीबद्दल काय प्रोब्लेम आहे. मी एकटी खेळत असले तरी एक कुठे तरी मैत्री होती ना. आपण एकमेकांच्या विरोधाच खेळू." असे जान्हवी बोलते.

पुढच्या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्कसाठी दोन टीम पाडण्यात आल्या होत्या. जान्हवी, अरबाज, वैभव, निक्की हे आधीपासूनच छान मित्र होते. या कॅप्टन्सी टास्क दरम्यान जान्हवी विरोधात निक्की, अरबाज, वैभव पाहायला मिळाले. दुसऱ्या फेरीत अरबाजने जान्हवीला कॅप्टन्सीच्या लढतीतून बाहेर केलं हे तिला अजिबात पटले नाही. यामुळे जान्हवी खूप दुखावली गेली. आता तिघे गेम कसा खेळणार? पुन्हा एकत्र येणार का? जान्हवी-निक्कीच्या मैत्रीच काय? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT