Jacqueline Fernandez  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jacqueline Fernandez: २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस कोर्टात हजर; अभिनेत्रीने सर्व आरोप फेटाळले

Jacqueline Fernandez: न्यायालयाने जॅकलिन फर्नांडिसच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी पुढे सरकत असताना २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अडचणी वाढल्या.

Shruti Vilas Kadam

Jacqueline Fernandez: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. बुधवारी (३ जून) ती दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात हजर झाली. सुनावणीदरम्यान जॅकलिनने न्यायालयासमोर आपली बाजू मांडत तिच्यावर केलेले सर्व आरोप स्पष्टपणे नाकारले. तिच्याविरोधात करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचा दावा तिने केला. सुनावणीनंतर मात्र तिने प्रसारमाध्यमांशी संवाद टाळण्याचा प्रयत्न केला.

हे संपूर्ण प्रकरण ठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित आहे. सुकेशवर एका उद्योगपतीच्या पत्नीची फसवणूक करून सुमारे २०० कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालय (ED) करत असून, तपासादरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.ED च्या आरोपांनुसार, सुकेशने फसवणुकीतून मिळालेल्या पैशांचा वापर जॅकलिन फर्नांडिस आणि तिच्या कुटुंबावर खर्च करण्यासाठी केला. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, जॅकलिनला महागड्या भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. यामध्ये आलिशान गाड्या, महागडे दागिने, डिझायनर हँडबॅग्ज, परशियन मांजरी यांचा समावेश होता.

ED ने कोर्टासमोर दाखल केलेल्या दोषारोपपत्रात जॅकलिनचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. यंत्रणेचा दावा आहे की, सुकेशच्या कामांविषयी आणि त्याच्याकडे कोणत्या प्रकारे पैसे येत आहेत याची जॅकलिनला पूर्ण माहिती होती तरीही चैनीसाठी तिने त्याच्याकडून सर्व भेटवस्तू स्वीकारल्या.

मात्र, जॅकलिनच्या लीगल टीमने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तिचे वकील म्हणाले, जॅकलिन स्वतः या कटाची बळी ठरली आहे. सुकेश हा एक बिझनेसमॅन असल्याचे सांगून जॅकलिनशी संपर्क साधला होता. त्यामुळे त्याचे चुकीचे काम अभिनेत्रीला नव्हते. हा संपूर्ण प्रकार बाहेर आल्यावरच तिला या गोष्टींची माहिती झाली, असा बचाव त्यांनी केला. अखेर न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू एकून आरोपीवर 'मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या' (PMLA) कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निरीक्षण नोंदवले आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास PMLA च्या कलम ४ अन्वये आरोपी शिक्षेस पात्र होतील असेही ते म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल आणि इतर १४ आरोपींवर न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. सर्व आरोपींनी स्वतःला निर्दोष असल्याचे सांगत खटला चालवण्याची मागणी केली आहे. आता प्रकरणाची पुढील सुनावणी १६ जुलै रोजी होणार असून, न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT