Jacqueliene Fernandez  Instagram @jacquelienefernandez
मनोरंजन बातम्या

Jacqueliene Fernandez In Hollywood: बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडही गाजवणार, जॅकलिन फर्नांडिसच्या फोटोमुळे चर्चांना वेग

Jacqueliene Fernandez Movie: जॅकलिन फर्नांडिसचा समावेश देखील आता हॉलिवूड स्टारमध्ये होणार आहे.

Pooja Dange

Jacqueliene Fernandez Share Photo With Hollywood Action Hero:

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या चर्चेत आहे. जॅकलिन हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची बोलले जात आहे. जॅकलिन फर्नांडिसने तिच्या सोशल मीडियावर हॉलिवूड ऍक्शन स्टार जीन-क्लॉड व्हॅन डॅमसोबत फोटो शेअर केला आहे.

जॅकलिन आणि जीन-क्लॉड इटलीला व्हेकेशनसाठी गेले आहेत. जॅकलिन फर्नांडिस तिच्या या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये हे नमूद केले आहे. जॅकलिनने तिच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'हॅविंग फन इन इटली, तुम्ही ठरावा काय ते?' तसेच व्हेकेशन, फॅशन आणि फन हे हॅशटॅग तिने वापरले आहेत.

जॅकलिन फर्नांडिसच्या या फोस्टवर अनेक सेलेब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. यामध्ये बॉलिवूडसह हॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश आहे. अभिनेता वरून धवनने कमेंट करत लिहिले आहे, 'लेजेंट, मी व्हॅन डॅमविषयी बोलत आहे जॅकी.' टोनी स्टार्कने देखील 'लेजेंट' अशी कमेंट केली आहे. अभिनेता सोनू सूदने जॅकलिनने शेअर केलेला फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत 'फॅब्युलस' असे लिहत तिचे अभिनंदन केले आहे.

जॅकलिन फर्नांडिसचा समावेश देखील आता हॉलिवूड स्टारमध्ये होणार आहे. याआधी प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, आलिया भट आणि धनुष हॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT