Jackie Shroff In CM House Instagram
मनोरंजन बातम्या

Jackie Shroff In CM House: 'जग्गु दादा'चा थाटच न्यारा; मुख्यमंत्र्यांच्या घरी आरतीत तल्लीन झालेला VIDEO चर्चेत

Jackie Shroff Viral Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी सर्व बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आरतीच्या वेळी जग्गु दादा यांनी सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

Chetan Bodke

Jackie Shroff In CM House

सध्या देशभरात 'गणेशोत्सव'चा सण मोठ्या उत्सवात आणि हर्षोल्हासात साजरा केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचे दर्शन घ्यायला येणाऱ्या सेलिब्रिटींची प्रचंड चर्चा होत आहे. काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अशातच सध्या सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींची जोरदार चर्चा होत आहे. संध्याकाळी आरतीच्या वेळी जग्गु दादा अर्थात जॅकी श्रॉफ यांनी सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधुन घेतले आहे.

सध्या त्यांचा हा आरतीमध्ये धम्माल मस्ती करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी, सलमान खान, शाहरुख खान, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, आशा भोसले, अर्जुन रामपाल, पंकज त्रिपाठीसह अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अर्जुन रामपाल, पंकज त्रिपाठी यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. (Bollywood Actor)

या व्हिडीओमध्ये जग्गु दादा उर्फ जॅकी श्रॉफ आपल्या खास अंदाजात आरती करताना दिसून येत आहे. सध्या त्यांची ही फ्री स्टाईल नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चेत आली आहे. बाजूला उभे असलेले सुनील शेट्टी, मिजान जाफरी, अर्जुन रामपाल, पंकज त्रिपाठी त्यांच्याकडे पाहतच राहिले. जॅकी श्रॉफ यांची ही आरतीमध्ये धमाल मस्ती करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी जॅकी श्रॉफ यांच्या स्टाईलची प्रचंड चर्चा होत आहे. ब्लॅक रंगाचा त्यांनी कुर्ता परिधान केले असून त्यावर रुमाल मफलर म्हणून घातला आहे. (Fashion)

सध्या या व्हिडीओची प्रचंड चर्चा होत असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या गणरायाचे दर्शन घेतानाचे सर्वच सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच सेलिब्रिटींचे श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यासोबतच मुख्यमंत्र्यांकडून सर्व सेलिब्रिटींना बाप्पाची मूर्तीही भेट म्हणून देण्यात आली. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT