Jaat Box Office Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jaat Box Office Collection : सनी देओलचा 'जाट' चित्रपट फ्लॉप की हिट? दुसऱ्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Jaat Box Office Collection Day 2 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'जाट' चित्रपट रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत. चित्रपटाची बॉक्स ऑफिस कामगिरी जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'जाट' (Jaat ) हा ॲक्शन चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 'जाट'मध्ये बॉलिवूडचे दोन सुपरस्टार आमनेसामने पाहायला मिळणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत सनी देओल झळकला आहे. तर खलनायकाच्या भूमिकेत रणदीप हुड्डा दिसत आहे. 'जाट' चित्रपटाने रिलीजच्या दोन दिवसात किती कोटींची कामाई केली जाणून घेऊयात.

'जाट' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

'जाट' चित्रपट रिलीज होऊन फक्त दोन दिवस झाले आहेत. दोन दिवसात या चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. 'जाट' 10 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सनी देओल आणि रणदीप हुड्डाच्या 'जाट' चित्रपटाने पहिल्या दिवशी 9.62 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी 7 कोटी रुपये कमावले आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत 'जाट' च्या दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे. दोन दिवसांत 'जाट' चित्रपटने 16.5 कोटी कमावले आहेत.

'जाट' चित्रपटात रणदीप हुड्डा 'रणतुंगा' या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटात सनी देओल , रणदीप हुड्डासोबत विनीत कुमार सिंह, सैयामी खेर आणि रेजिना कॅसेंड्रा यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'गदर २'नंतर सनी देओलने 'जाट'मधून एन्ट्री मारली आहे. जाट' चित्रपटातील डायलॉगला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.

"ये ढाई किलो की हात की ताकद पूरा नॉर्थ देख चुका है अब साऊथ देखेगा" हा चित्रपटातील डायलॉग खूप प्रसिद्ध झाला आहे. 'जाट' चित्रपटात मराठी प्रसिद्ध अभिनेता उपेंद्र लिमये देखील आहे. 'जाट' चित्रपटाचे दिग्दर्शन गोपीचंद मालीनेनी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT