Ishaan Khatter canva
मनोरंजन बातम्या

Ishaan Khatter: ईशान खट्टर 'या' अभिनेत्रीला करतोय डेट, स्वतःच केला नावाचा खुलासा; म्हणाला...

ishaan khatter gf : बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर एका मुलीला डेट करतोय अशी चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये सुरु आहे. त्याने मीडियाला सुद्धा ही तो सिंगल नाही अशी बातमी दिली. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री चांदनी बेंझ हीच्या सोबत डेट करतोय अशी अफवा चाहत्यांमध्ये पसरली आहे. जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेता ईशान हट्टरने 'धडक' चत्रपटाच्या साहाय्याने हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. २०१८ मध्ये त्याने या करियरला सुरु केली. पूढे त्याने अनेक चित्रपटात काम केली. नुकताच त्याची एक मॅकझिनशी संबधीत मुलाखत झाली त्यात तो म्हणाला, 'मी 'आता सिंगल नाही. माझ्या वयैक्तिक आयुष्यात जी मुलगी आहे तीचं नाव मला सांगायचं नाही. याचा परिणाम त्या व्यक्तिच्या कामावर होऊ शकतो. म्हणून मी काही गोष्टी मीडियाला सांगणार नाही.'

पिप्पा मधल्या या अ‍ॅक्टरने त्याच्या जुन्या रिलेशनशिपचा उल्लेख केला आणि म्हणाला , 'माझ्यासारख्या प्रस्थापित नसलेल्या व्यक्तिसोबत माझे नाते सुरु आहे, त्यामुळे मी ज्या व्यक्तीसोबत आहे तिच्यावर कसा परिणाम होतो याची मला जाणीव आहे.' या कारणामुळे तो वैयक्तिक आयुष्याबद्दल गुपित ठेवणार आहे. पण सध्या तो एका मलेशिअन मॉडेल सोबत फिरत असतो. २०२३ मध्ये ते दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते. ईशानच्या सावत्र भावाच्या 'तेरी बातों मैं ऐसा उलझा जिया' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला ते दिसले होते.

बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर नेटफ्लिक्सच्या 'द परफेक्ट कपल' (the perfect couple) या सिरीजमुळे खूप चर्चेत आहे. त्याने केलेल्या कामाने चाहते ईशानच्या प्रेमात पडले आहेत. ईशान खट्टर चित्रपटात काम करत होता. आता तो वेब सिरीजमध्ये सुद्धा धुमाकूळ घालतोय. हा अभिनेता बॉलिवूड स्टार शाहिद कपूर याचा भाऊ आहे. शाहिद कपूरने त्याच्या ही आयुष्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमवलं.

सुझान बियर दिग्दर्शित 'द परफेक्ट कपल' (the perfect couple)या वेब सिरीजमध्ये ईशान हट्टरने खूप मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं. त्यात जेष्ठ अभिनेत्री निकोल किडमन ही मुख्य भुमिकेत दिसत आहे. वेब सिरीजमध्ये क्राइम ड्रामा , थ्रिलर, रहस्य ,कपल्स आहेत. या प्रकारच्या सिरीज प्रेमींसाठी ही उत्तम सिरीज असणार आहे. यात निकोल किडमन सोबत मुख्य भुमिकेत ईशान हट्टरने काम केले आहे. या आधी ईशान खट्टर चित्रपटात काम करत होता. आता तो वेब सिरीजमध्ये सुद्धा धुमाकूळ घालतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

SCROLL FOR NEXT