Hardik Pandya marry Mahieka Sharma Saam tv
मनोरंजन बातम्या

Hardik Pandya Marriage: हार्दिक पंड्या 'या' तारखेला गर्लफ्रेंड महिका शर्मासोबत करणार लग्न? व्हायरल पोस्टमागील नेमकं सत्य काय?

Hardik Pandya marry Mahieka Sharma: हार्दिक पंड्या आणि माहिका शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. मे महिन्यात रोजी उदयपूरमध्ये खासगी सोहळा होणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.

Shruti Vilas Kadam

Hardik Pandya marry Mahieka Sharma: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. IPL 2026 दरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून, त्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या 22 मे रोजी मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्मासोबत लग्न करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

व्हायरल पोस्टनुसार, हार्दिक आणि माहिका यांचा विवाह राजस्थानमधील उदयपूर येथे खासगी पद्धतीने पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करण्यात आलेल्या या पोस्टला हजारो लाइक्स आणि रिपोस्ट मिळाले. त्यामुळे ही बातमी काही तासांतच इंटरनेटवर वेगाने पसरली.

मात्र, या सगळ्या चर्चांदरम्यान अनेक माध्यमांनी या पोस्टची सत्यता तपासली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, ही पोस्ट एका पॅरोडी अकाउंटवरून शेअर करण्यात आली होती. याआधीही या अकाउंटवरून अनेक क्रिकेटपटूंविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हार्दिक आणि माहिका यांच्या लग्नाबाबत सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, हार्दिक पंड्या आणि माहिका शर्मा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. दोघे अनेकदा एकत्र दिसले असून, सोशल मीडियावरही त्या दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत. याआधी या दोघांच्या एंगेजमेंटच्या अफवाही समोर आल्या होत्या. मात्र, त्यावरही दोघांनीही कोणती प्रतिक्रिया दिली नव्हती.

हार्दिक पंड्याचं याआधी अभिनेत्री नताशा स्टेनकोविक हिच्यासोबत लग्न झालं होतं. 2024 मध्ये दोघांनी वेगळ होण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली होती. त्यानंतर हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. सध्या तरी हार्दिक पांड्या किंवा माहिका शर्मा यांच्याकडून लग्नाच्या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसांत या अफवांबाबत नेमकी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer: वारंवार पोटदुखी होतेय? पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं ओळखा

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात सात धरणे तुडुंब

रोजच्या 8 सवयी ज्या डोळ्यांसाठी घातक, वेळीच घ्या काळजी, नाहीतर...

Boiled Egg Peeling: उकडलेले अंडे सोलताना तुटतेय? 'या' सोप्या ट्रिकने काही सेकंदात निघेल कवच

Typing Side Effects : कॉम्प्युटरवर तासन्‌तास टायपिंग करणं ठरू शकतं महागात, शरीराला जखडतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT