International Bikini Day 2022 Saam TV
मनोरंजन बातम्या

International Bikini Day 2022: बिकिनीचा रंजक इतिहास; कुणी केली बिकिनीची पहिली जाहिरात?

International Bikini Day 2022 Marathi News: १९५१ मध्ये पहिल्यांदाच 'मिस वर्ल्ड' या सौंदर्यस्पर्धेत स्पर्धकांनी बिकिनी घातली होती. मात्र त्यानंतर अशा सौंदर्यस्पर्धेत बिकिनीवर बंदी घालण्यात आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज जागतिक बिकिनी दिवस (International Bikini Day 2022) जगभरात साजरा केला जातोय. स्त्रियांमध्ये लोकप्रिय असलेल्या हा कपड्यांचा प्रकार आज जगभरात वापरला जातो. खासकरुन समुद्रकिनारी किवा जलतरण तलावावर बिकीनी परिधान करण्याचं प्रमाण जास्त आहे. दोन भागांत विभागलेल्या या अतिशय लहान कपड्यांत स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते, अर्थात ज्या महिलांना बिकिनी परिधान करण्यात संकोच वाटत नाही अशा स्त्रियांमध्ये बिकिनी जास्त प्रसिद्ध आहे. दोन भागांमध्ये बिकिनीचा सेट परिधान केला जातो. एक म्हणजे स्त्रियांचे स्तन झाकण्यासाठी वरचा भाग आणि गुप्तांग (योनी) झाकण्यासाठी खालचा भाग अशा दोन भागांमध्ये बिकिनी परिधान केली जाते. बिकिनीला स्विम सूटही म्हटले जाते. सध्याच्या घडीली बिकिनीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. आज जागतिक बिकिनी दिवसाच्या निमित्ताने याबद्दल अधिक माहिती घेऊयात (International Bikini Day 2022 Information In Marathi)

हे देखील पाहा -

बिकिनीला विरोध

फ्रेंच ऑटोमोबाइल इंजीनिअर आणि फॅशन डिझायनर लुइस रिअर्ड (Louis Reard) यांनी बिकिनी तयार केली. ५ जुलै १९४६ रोजी पहिल्यांदाच मिशलिन बर्नर्डिनी (Micheline Bernardini) या मॉडेलने ही बिकिनी घातली होती. बिकिनी हे नाव बिकनी अटॉल यावरून देण्यात आलं. बिकनी अटॉल (Bikni Atoll) हे एका जागेचं नाव आहे. फ्रेंच महिलांना बिकिनीची डिझाइन फार आवडली होती पण तिथल्या कॅथलिक चर्चने बिकिनीवर आक्षेप घेतला होता. इतकंच नाही तर तिथल्या प्रसारमाध्यमांनीही बिकिनीला तीव्र विरोध दर्शवला होता. १९५१ मध्ये पहिल्यांदाच 'मिस वर्ल्ड' या सौंदर्यस्पर्धेत स्पर्धकांनी बिकिनी घातली होती. मात्र त्यानंतर अशा सौंदर्यस्पर्धेत बिकिनीवर बंदी घालण्यात आली होती.

१९५३ मध्ये पार पडलेल्या कान चित्रपट महोत्सवादरम्यान बीचवर बिकिनी घातल्याने अभिनेत्री ब्रिजेट बार्डो Bridget Bardot फार चर्चेत आली होती. त्यानंतर इतर बऱ्याच अभिनेत्रींनी बिकिनीचा वापर सुरू केला. तर १९६० मध्ये 'प्लेबॉय' playboy आणि 'स्पोर्ट्स इलुस्ट्रेटेड' sports illustrated या प्रसिद्ध मासिकांच्या कव्हरपेजवर बिकिनीत मॉडेल झळकल्या होत्या.

पहिल्यांदा बिकिनी कुणी परिधा केली होती

बिकिनीचा शोध लागल्यानंतर बराच काळ कोणतीही अभिनेत्री, मॉडेल ती घालायला तयार नव्हती. कोणतीही महिला याची जाहिरात करायलाही तयार नव्हती, पण त्याकाळी एका १९ वर्षीय डान्सर मिशेलिन हिने बिकिनीची जाहिरात करण्याचे मान्य केले. जाहिरात आल्यानंतर मिशेलिनला सुमारे ५० हजार चाहत्यांची पत्रे मिळाली. यानंतर १९५१ मध्ये झालेल्या पहिल्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेच्या स्पर्धकांनीही बिकिनी परिधान केली होती.

बिकिनी म्हणजे फॅशन स्टेटमेंट

सौंदर्य स्पर्धेनंतर स्पेन आणि इटलीसह अनेक देशांमध्ये बिकिनी घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. पण त्यानंतर हळूहळू बिकिनी समाजात स्वीकारली गेली. यानंतर महिलांमध्ये बिकिनी घालण्याचा ट्रेंड वाढत गेला आणि त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरही ती घालायला सुरुवात केली. बिकिनी हे आजच्या काळात महिलांचे सर्वात आवडते बीचवेअर बनले आहे. बदलत्या काळानुसार फॅशनसोबतच बिकिनी घालणे आवश्यक मानले जात होते. आजच्या काळात तरुण पिढीसाठी बिकिनी हे फॅशन स्टेटमेंट बनले आहे. मॉडेल्सपासून अभिनेत्रींपर्यंत बिकिनी घालून हॉट फोटोशूट करतात. आजच्या काळात बिकिनी घालणे हा एक पुरावा आहे की तुम्ही केवळ फॅशनेबल नाही तर पूर्णपणे फिटही आहात.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, नेटकऱ्यांनी जोरदार फटकारले; VIDEO

Maharashtra Rain Live News: मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

SCROLL FOR NEXT