Influencer Private Video Leaked Saam Tv
मनोरंजन बातम्या

Influencer Private Video Leaked: प्रसिद्ध इंफ्लुएन्सरचा खासगी व्हिडिओ लीक; सोशल मीडियात मोठी खळबळ

Influencer Private Video Leaked: सोशल मीडिया इंफ्लुएन्सरच्या जगतात सध्या मोठी खळबळ उडाली असून एकामागोमाग एक स्कँडल समोर येत असून, अनेक इंफ्लुएन्सरचे खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shruti Vilas Kadam

Influencer Private Video Leaked: पाकिस्तानातील सोशल मीडिया इंफ्लुएन्सरच्या जगतात सध्या मोठी खळबळ माजली आहे. एकामागोमाग एक स्कँडल समोर येत असून, अनेक लोकप्रिय इंफ्लुएन्सरचे खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घडामोडींमुळे संपूर्ण पाकिस्तानातील डिजिटल जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

या वादाची सुरुवात टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक आणि इम्शा रहमान यांच्या व्हिडिओंनी झाली. त्यांच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाल्याने चर्चांना तोंड फुटले. काही लोकांनी या व्हिडिओंना बनावट ठरवले, तर काहींनी या इंफ्लुएन्सरवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे प्रकरण थांबण्याऐवजी अधिक गंभीर होत गेले.

यानंतर प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री माथीरा खान हिचेही काही खाजगी व्हिडिओ ऑनलाइन समोर आले, ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्येही मोठा गोंधळ निर्माण झाला. माथीराने मात्र अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सोशल मीडियावर मात्र तिच्या समर्थनात व विरोधात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान राखण्याचे आवाहन केले आहे.

या साखळीत आता आणखी एक मोठं नाव म्हणजे कंवल आफताबहिचेही व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे. टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असलेल्या कन्वलचे व्हिडिओ समोर आल्याने हा वाद अधिकच वाढला आहे. पाकिस्तानातील सायबर गुन्हे शाखेकडून या प्रकरणांची चौकशी सुरु आहे, मात्र इतकं मोठं प्रमाण पाहता हा डेटा लीक कसा झाला यावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. सोशल मीडियावर सध्या ‘प्रायव्हसी’ आणि ‘ऑनलाइन सेफ्टी’बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु असून अनेक इंफ्लुएन्सरने या घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT