Indrayani  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Indrayani : इंदू-अधूच्या संसारात नव्या संकटाची चाहूल, गोपाळचा नेमका प्लान काय? पाहा VIDEO

Indrayani Marathi Serial Update : 'इंद्रायणी' मालिकेला आता रंजक वळण आले आहे. इंदू-अधूच्या नात्यात गोपाळ फूट पाडणार आहे. मालिकेत पुढे काय होणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

इंदू आणि अधूचे लग्न झाल्यापासून 'इंद्रायणी' (Indrayani ) मालिकेला एक रंजक वळण आले आहे. अलिकडेच इंदू-अधूचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. मात्र, लग्नानंतर लगेचच त्यांच्या संसारामध्ये संकटांची मालिका सुरू झाली आहे. इंदू आणि अधूच्या नात्याला आनंदीबाई आणि गोपाळने मोठं आव्हान दिलं आहे.

गोपाळ आणि आनंदीबाई दोघांचंही ठाम मत आहे की, इंदू आणि अधूचा संसार सुखाचा होऊ द्यायचा नाही. त्यामुळे मालिकेत प्रत्येक दिवशी नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. 'इंद्रायणी' मालिकेत शंकुतलाला पोटाचा कॅन्सर झालेला आहे. त्यामुळे तिच्या उपचारांची जबाबदारी गोपाळ घेतो. त्यामुळे तो वाड्यात पुन्हा पाय ठेवतो. पण यामागे गोपाळचा काही तरी वेगळा हेतू आहे. त्याला इंदू आणि अधू नात्यात फूट पाडायची आहे.

इंदू-अधूचा नव्याने सुरू झालेला संसार उध्वस्त करणे. आता मालिकेत गोपाळ कोणते नवीन डावपेच आखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नवीन संकटाला इंदू कशी मात देणार हे येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. एकीकडे इंदू तिच्या संसारासाठी झगडते आहे तर दुसरीकडे अधूवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे त्यांचं नातं अधिक घट्ट होते. इंदू आणि अधू देव दर्शनाला गेले असताना अधूवर हल्ला होतो पण त्या कठीण प्रसंगात दोघेही एकमेकांच्या साथीने यातून बाहेर पडतात.

अधूचा रुसवा दूर होतो आणि नव्याने संसार सुरू होतो. पण या नवीन सुरुवातीलाच गोपाळचं परतणं आणि त्यात आनंदीबाईंची साथ हे सर्व गोष्टी पुन्हा एकदा वादळाची चाहूल देतात. गोपाळ आपल्या प्लॅनमध्ये यशस्वी होणार का? इंदू आणि अधू हे नवं आव्हान कसं पार करतील? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'इंद्रायणी' मालिका रविवारी दुपारी 29 जून 2025 ला दुपारी. १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT