Indrayani SAAM TV
मनोरंजन बातम्या

Indrayani : 'इंद्रायणी' मालिकेत रंगणार अटीतटीचा सामना, इंदू की गोपाळ कोण जिंकणार मॅच?

Indrayani Marathi Serial Update : 'इंद्रायणी' मालिकेत आता क्रिकेटचा सामना रंगणार आहे. मालिका कोणते नवीन वळण घेणार जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'इंद्रायणी' (Indrayani ) मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेत आता नवीन टप्पा पाहायला मिळत आहे. 'इंद्रायणी' मालिकेत विठूच्या वाडीत सध्या गोपाळच्या अनुपस्थितीमुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. पप्याच्या खोलीत राहण्यास नकार देणाऱ्या गोपाळला इंदूने क्रिकेटच्या सामन्यासाठी आव्हान दिलं आहे.

आता पुन्हा 'इंद्रायणी' मालिकेत मोठे वळण पाहायला मिळणार आहे. सामना हरल्यास त्याला इंदूचे म्हणणे ऐकावे लागेल. गोपाळ हे आव्हान स्वीकारतो आणि आता सामन्यात काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. एकीकडे तीन मित्रांची मैत्री घट्ट होताना दिसतेय तर दुसरीकडे आनंदी अधूच्या आयुष्यातला एक मोठा निर्णय घेताना दिसणार आहे.

इंदूने गोपाळला सामन्यासाठी आव्हान दिल्यावर आता अधू तिच्या बाजूने खेळायला सज्ज झालाय. इंदूला जिंकवण्यासाठी अधू काहीही करेल हे त्याने स्पष्ट केलंय. इंदू आणि गोपाळ यांच्यात रंगलेल्या सामन्यात कोण विजेता होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत चालली आहे. इंदू क्रिकेट मॅच जिंकली तर गोपाळला ती सांगेल ते ऐकावे लागणार आहे.

आता मालिकेत अटीतटीचा सामना रंगणार आहे. गोपाळ VS इंदू अशी मॅच पाहायला मिळणार आहे. गोपाळला विठूच्या वाडीत परत आणण्यासाठी इंदू आणि अधूचा प्लान यशस्वी होईल का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'इंद्रायणी' मालिका संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते. चाहते मालिकेच्या आगामी भागांसाठी खूप उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सैलानी बाबांच्या दरबारात लाखो भाविकांची मांदियाळी..

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

मंत्र्याच्या भावाला-पुतण्याला बेदम मारहाण; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Weight Loss Tips For Man: पुरूषांनी वजन कमी करण्यासाठी 7 टिप्स फॉलो करा, सुटलेलं पोट जाईल आत

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

SCROLL FOR NEXT