Marathi Serial  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Serial : इंदू कसा करणार खोट्या काका-काकूंचा पर्दाफाश? पाहा 'महाशिवरात्री'चा विशेष भाग

Indrayani and Lai Avadtes Tu Mala : 'महाशिवरात्री' च्या विशेष भागात 'इंद्रायणी' आणि 'लय आवडतेस तू मला' मालिकेत नवे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.

Shreya Maskar

'इंद्रायणी' (Indrayani ) आणि 'लय आवडतेस तू मला' (Lai Avadtes Tu Mala ) मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. या मालिकांमध्ये महाशिवरात्रीचे विशेष भाग दाखवले जाणार आहेत. 'इंद्रायणी' मालिकेत महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कथानकात नवे वळण येणार आहे. इंद्रायणीचे काका-काकू खरे नसून ते फसवे असल्याचे समजताच ते इंदूला धमकी देतात की, जर तिने हे सत्य कोणालाही सांगितले तर अधूच्या जीवाला धोका होईल. यामुळे इंद्रायणी संभ्रमात पडते आणि या परिस्थितीत इंद्रायणी गुप्तपणे गोपाळला सत्य कळवण्याची योजना आखते.

महाशिवरात्रीचा (Mahashivratri ) दिवस उगवतो. इंदूला काका-काकूंकडून महाशिवरात्रीच्या कीर्तनाची परवानगी मिळते. कीर्तनाच्या वेळी ती 'पुत्रणा मावशीचे कीर्तन' सादर करत असताना गोपाळला काका-काकू खरे नसल्याचे संकेत देते. आता यामुळे इंद्रायणी खोड्या काका - काकूंचा पर्दाफाश कशी करणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

'लय आवडतेस तू मला' मालिकेत सरकार - सानिकाचा कळशी गावातील गावकऱ्यांसोबतच लढा सुरूच आहे. साहेबरावांनी साखर कारखाना बंद केल्यानंतर कळशीगाव बेरोजगारीसाठी सानिका आणि सरकारला जबाबदार धरते. मात्र, या विरोधातही सानिका हार मानत नाही. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ती एक नवा मार्ग शोधते आणि तो म्हणजे 'चहाचा गूळ’ तयार करण्याचा. मात्र गावकरी तिच्या कल्पनेला अशक्य मानून तिची खिल्ली उडवतात.

सानिका आव्हान स्वीकारून स्वतः गूळ बनवून दाखवण्याचा निर्धार करते. दरम्यान, सरकारदेखील महादेवाची कृपा मिळवण्यासाठी कठोर व्रत करताना दिसणार आहे. सानिकाच्या अथक प्रयत्नांना यश मिळावे, म्हणून सरकार प्राचीन महादेव मंदिरातील शिवलिंगावर 101 वेळा नदीचे पाणी वाहण्याचा संकल्प करतो. एकीकडे सानिका गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि बेरोजगारी मिटवण्याच्या प्रयत्नात आहे तर दुसरीकडे सरकार तिला यश मिळावे यासाठी झुंजतो आहे.

महादेवाच्या आशीर्वादाने सानिका - सरकार कसे हे आव्हानं पार करणार. हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'इंद्रायणी' आणि 'लय आवडतेस तू मला' मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग २६ फेब्रुवारी संध्याकाळी ७ वाजता आणि रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT