Pawandeep Rajan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pawandeep Rajan : हाताला फ्रॅक्चर अन् पायला दुखापत, रुग्णालयात पवनदीप राजननं गायलं गाणं, VIDEO व्हायरल

Pawandeep Rajan Viral Video: अलिकडेच 'इंडियन आयडल १२' विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात झाला आहे. सध्या त्याचा हॉस्पिटलच्या बेडवर बसून गाणे गातानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

'इंडियन आयडल 12'चा विजेता पवनदीप राजनचा (Pawandeep Rajan) अलिकडेच भयानक अपघात झाला आहे. आता त्याच्या तब्येतीत सुधारणा पाहायला मिळत आहे. अशात आता पवनदीप राजनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पवनदीप हॉस्पिटमध्ये गाणे गाताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

पवनदीपच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पवनदीप हॉस्पिटच्या बेडवर बसून गाणे गात आहे. खूप वेळानंतर त्याचा आवाज ऐकून चाहते वेडे झाले आहेत. त्याने 'जो भेजी थी दुआ' हे गाणे गायले आहे. त्याच्या आवाजातील चढउतार पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. हे गाणे इमरान हाश्मीच्या 'शंघाई' चित्रपटातील आहे. चित्रपटात हे गाणे अरिजीत सिंह याने गायले आहेत. या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

पवनदीप राजनचा अपघात

अलिकडेच पवनदीप दिल्ली जात असताना त्याच्या कारचा भीषण अपघात झाला. त्याच्या कारचा चालक झोप लागली आणि कारचा ताबा सुटला. त्यामुळे कार एका ट्रकला धडकली आणि पवनदीप गंभीर जखमी झाला. सध्या पवनदीपवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

'इंडियन आयडल 12'

पवनदीप राजन मूळचा उत्तराखंडचा आहे. 'इंडियन आयडल 12' विजेता झाल्यावर त्याचे आयुष्य बदलले. त्याने आजवर अनेक सुरेल गाणी गायली आहेत. त्याच्या म्युझिक कॉन्सर्टला चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते. पवनदीप राजनला पुन्हा गाताना पाहून चाहते खूपच खुश झाले आहेत. चाहते कमेंट्समध्ये त्याच्या गाण्याचे कौतुक आणि तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पाऊस, शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान...

Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची चौकशी, ४ तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

Ex गर्लफ्रेंडसोबत मरायचा प्लान आखला, कारमध्ये बसून बॉम्बस्फोट केला, तरुण जिवंत जळाला अन्..;

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतील 'या' 5 टिकली डिझाईन्स; प्रत्येक महिलेने आजच ट्राय करा

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

SCROLL FOR NEXT