Natasha Stankovic Left Mumbai 
मनोरंजन बातम्या

Hardik-Natasha: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हार्दिकच्या बायकोनं लेकासोबत सोडली मुंबई? विमानतळावरील व्हिडिओ आला समोर

Natasha Stankovic -Hardik Pandya Divorce: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि नताशा स्तांकोविक यांच्यात आलबेल नसून ते लवकरच विभक्त होणार असल्याच्या चर्चांनी वेग धरलाय. या चर्चा पुन्हा नव्याने सुरू होण्याचं कारण ठरलाय नताशाचा मुंबई विमानतळावरील व्हिडिओ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैष्णवी राऊत, साम प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटर हार्दिक पंड्याच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. हार्दिक आणि नताशा यांच्यात सगळं काही आलबेल नाहीय. हार्दिक आणि नताशा लवकरच विभक्त काडीमोड घेतील, असं बोललं जातंय. या चर्चांदरम्यान आता नताशाचा एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यावरून नताशाने मुलासोबत मुंबई सोडली असल्याची चर्चा रंगू लागलीय.

हार्दिक पंड्याची बायको नताशा स्तांकोविक मुंबई विमानतळावर दिसली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नताशासोबत मुलगा अगस्त्यही दिसतोय. नताशासोबत काही बॅग्सही होत्या. नताशा गाडीतून उतरली, गाडीतून दोन बॅग काढल्या आणि मुलाचा हात धरून एअरपोर्टच्या दरवाजाकडे जाते असं या व्हिडिओमध्ये दिसतंय. यावेळी पापाराझींना पाहून नताशाने स्माईल दिली. शिवाय त्यांना बाय बोलतानाही ती दिसतेय.

विमानतळावर पोहोचण्याआधी नताशाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती बॅग पॅक करताना दिसते. फोटोला कॅप्शन देताना 'ही वर्षातील ती वेळ आहे' असं लिहित नताशाने दिल, घर आणि विमानाचा इमोजी लावलाय. त्यानंतर काहीवेळाने तिने दुसरा फोटो पोस्ट केला. यामध्ये ती ड्रायव्हिंग करताना दिसली होती.

यानंतर नताशाचा विमानतळावरील व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांना कोडं पडलंय, ते म्हणजे नताशा गेली कुठे? दरम्यान नेटकरी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. नताशा तिच्या आई-वडिलांच्या घरी सर्बियाला गेलीय. तिचा फोटो, त्यावरील कॅप्शन पाहून काहींनी असा तर्क लावलाय. तर हार्दिक सोबत सगळं काही आलबेल नसल्यानेच नताशाने मुंबई सोडल्याचं काहीजण बोलत आहेत.

काही दिवसांपूर्वी नताशाने एक पोस्ट केली होती ज्यामध्ये ती म्हणाली होती, 'माझ्याकडून पुन्हा तुम्हाला एक आठवण. देव तुमच्या जीवनातील समस्या कधीच दूर करत नाही, तो फक्त तुमच्यासाठी मार्ग तयार करतो. या पोस्टवरही नताशा कुठेतरी तिच्या नात्याबद्दल बोलत असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला होता. आता नेमकं खरं काय? हे तर नताशा आणि हार्दिकच सांगू शकतील. पण घटस्फोटाच्या चर्चांव दोघांनीही अद्याप मौनच बाळगलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

Dhananjay Munde vs Manoj Jarange: धनंजय मुंडेंचा जरांगेंना विरोध की अस्तित्वाचा संघर्ष?

Prem Birhade News : पुण्याच्या कॉलेजचा 'मॉडर्न' जातीयवाद? तरुणाला गमवावी लागली लंडनमधील नोकरी, VIDEO

Mumbai Crime : मुंबईत अनेक घरे; २०० पेक्षा जास्त चेले; बांगलादेशी किन्नरजवळ सापडलं कोट्यवधींचं घबाड

SCROLL FOR NEXT