Indian 2 Intro Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Indian 2 Intro Video: कम बॅक इंडियन! भ्रष्टाचार करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार;'इंडियन 2'ट्रेलर रिलीज

Indian 2 Movie: कमल हासन यांचा 'इंडियन 2' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shraddha Thik

Indian 2 Teaser:

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे कमल हसन. कमल हसन हे नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतात. ते नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. कमल हासन यांचा 'इंडियन 2' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

तब्बल 27 वर्षानंतर 'इंडियन' चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात कमल हसन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार असून 'इंडियन 2' चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसतेय. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते. त्यानंतर आता टीझरही रिलीज झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पहिला भाग जिथे संपला तिथूनच टीझरला सुरुवात झाली आहे. टीझरच्या सुरुवातीलाच कमांडर वचन देताना दिसतोय की, 'भष्ट्राचार वाढल्यास तो पुन्हा येईल आणि त्याने ते वचन पाळले आहे'. यानंतर अनेक लोक भ्रष्टाचार करताना दिसून येतात.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अनेक लोक 'कम बॅक इंडियन' बोलताना दिसतात. टीझरमध्ये ठिक ठिकाणी असलेले लोक कम बॅक इंडियन असे बोलत इंडियनला बोलवताना दिसतात. त्यानंतर सुपरस्टार कमल हासन यांची एन्ट्री होते. तर हा असाच 'कम बॅक इंडियन' हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतोय.

'इंडियन 2' चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. काही तासातच व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहे. चित्रपटात कमल हसन, रकुल प्रीत सिंह, काजल अग्रवाल, प्रिया भवानी शंकर, नेदुमुदी वेणू अशी स्टारकास्ट दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार, मोदींच्या हस्ते उद्घाटन; कुठून-कुठे असणार प्रवास

Maharashtra News Live Update: माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाले

Palghar Fort : शौर्य अन् इतिहासाचा अनमोल वारसा, पालघरमध्ये वसलाय 'हा' भव्य किल्ला

Sleeping Problems: रोज ६ तासांपेक्षा कमी झोपता? शरीरावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Chanakya Niti : ऑफिसमध्ये जळणारे सहकारीही करतील कौतुक! चाणक्यांच्या या ७ नीती ठरतील यशाची गुरुकिल्ली

SCROLL FOR NEXT