Pathan Controversy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan Controversy: सोलापुरात 'पठान'चा शो बंद पाडण्याचा प्रयत्न, 11 जणांवर गुन्हा दाखल

सोलापुरात 'पठान' चित्रपटाचाचा शो बंद पडणाऱ्या 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वभूषण लिमये

Protest Against Pathan In Solapur: 'पठान' चित्रपटाची सर्वत्र चर्च आहे. ४ वर्षांनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते गर्दी करत आहेत. या गर्दीचा परिणाम 'पठान' बॉक्स ऑफिस कलेक्शनवर देखील झाला आहे. चित्रपटाने ३ दिवसात जगभरातील कमाईत ३०० करोडचा आकडा पार केला आहे. परंतु अद्याप 'पठान' चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे. सोलापुरात चित्रपटाचा शो बंद पडण्याचा काही आंदोलकांनी प्रयत्न केला.

सोलापुरात 'पठान' चित्रपटाचाचा शो बंद पडणाऱ्या 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमा चित्रपटगृहासमोरील 'पठान' चित्रपटाचे पोस्टर फाडत हे आंदोलक घोषणाबाजी देखील करत होते.

राम गोणे, सिद्राम चरकुपल्ली, नागेश बंडी, सुधाकर बहिरवाडे, सागर सिद्धूल, राज चिप्पा, अंबादास गोरंटला, प्रशांत परदेशी, आनंद मुसळे, शितल परदेशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

शाहरुख खानाच्या फॅन्सनी जिथे 'पठान' चित्रपट पाहण्यासाठी अख्ख थिएटर बुक केले होते. त्याच सोलपुरात प्रदर्शनाच्या ४ दिवसानंतर चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे. 'पठान' चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाला विरोध करण्यात येत होत. चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर विरोध आणखी तीव्र झाला. देशात अनेक ठिकाणी चित्रपटाच्या विरोधात आंदोलने झाली. चित्रपटाचे तसेच कलाकारांचे पोस्टर देखील जाळण्यात आले.

हिंदूंच्या भावना दुखावल्याचे आरोप अनेक हिंदू संघटनांनी केला. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी देखील चित्रपटाला कडाडून विरोध केला होता. 'बेशरम रंग' या गाण्यातील भगव्या बिकिनीमुळे 'पठान' चित्रपटाला विरोध करत अनेक आरोप करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT