Alia Bhatt Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt : ...अन् कधी नव्हे ती आलिया भट्ट इतकी भडकली; म्हणाली, मी आवडत नसेल तर...

एका मुलाखतीत अलियाला नेपोटिझम आणि ट्रोलिंगविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावरच्या अलियाच्या उत्तराने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. लग्न, चित्रपट आणि प्रेग्नेंसी यामुळे अलिया सतत चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडेच अलिया तिच्या प्रेग्नेंसी फॅशनमुळे चर्चेत होती. अनेकदा आलियानं बेबी बंप फ्लॉन्ट केला होता. तिचे हे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. याचदरम्यान, एका मुलाखतीत अलियाला नेपोटिझम आणि ट्रोलिंगविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावरच्या अलियाच्या उत्तराने(Social Media) सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

दमदार अभिनय करणाऱ्या मोजक्याच अभिनेत्रींमध्ये अलिया भट्टची गणना होते. अलियाने तिच्या कामात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले आहे. अनेक उत्तमोत्तम चित्रपट करत अलियाने स्वत:ला सिद्ध केले आहे. यामुळेच अनेकदा अलियाला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. आता पुन्हा एकदा अलिया तिच्या विधानाने चर्चेत आली आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये अलियाने तिच्याविषयीच्या अनेक प्रश्नांना बेधडकपणे उत्तर दिले आहेत. दरम्यान अलियाला नेपोटिझम आणि ट्रोलिंगचा तुझ्यावर काय परिणाम होतो? असे विचारले असता, अलियाने सांगितले की "नेपोटिझमचा आणि ट्रोलिंगचा सामना करण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे मी माझी योग्यता सिद्ध करू शकते. माझे काम आणि माझ्या चित्रपटांनीच मी या वादाला पूर्णविराम देईल, असा मला विश्वास आहे."

" ट्रोल करणाऱ्याला प्रतिक्रिया देऊ नका त्याविषयी वाईट वाटून घेऊ नका, अर्थातच मला वाईट वाटतं. परंतु,आपल्याला जे काम आवडतं ज्याचा आपण सन्मान करतो त्याबद्दल वाईट वाटून घेणं ही अत्यंत लहान गोष्ट आहे. अशा गोष्टींकडे मी तरी दुर्लक्ष करते आणि माझ्या कामाकडे लक्ष केंद्रित करत असते," असेही ती म्हणाली.

नेहमीच मी स्वतःचा बचाव करू शकत नाही. जर तुम्हाला मी आवडत नसेल तर माझे चित्रपट पाहू नका. या अशा गोष्टी आहेत ज्याबद्दल मी काहीही करू शकत नाही. लोकांना नेहमीच काही ना काही बोलायंच असतं. मला आशा आहे की मी माझ्या चित्रपटांमधून त्यांना उत्तर देऊ शकेन," असंही ती बेधडकपणे म्हणाली.

"जसे की मी कुठे जन्मलो किंवा माझे आई- वडील कोण आहेत. या काही गोष्टी माझ्या नियंत्रणात नाहीत. मी जे काही आहे ते वडिलांमुळे. तसेच मी सुद्धा खूप मेहनत घेतली. या भूमीवर येणाऱ्या माझ्या बाळाला जरी अभिनयात करिअर करायचं असेल तर मी त्याला सांगेन की तुला यासाठी प्रंचड मेहनत करावी लागेल. या गोष्टी अजिबात सोप्या नाहीत, असं ती म्हणाली.

वर्कफ्रंट विषयी बोलायचे तर, सध्या आलिया तिच्या आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ब्रह्मास्त्रनंतर आलिया अनेक चित्रपटांत काम करणार आहे. अलीकडेच, आलियाचा डार्लिंग्स नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. ज्यात शेफाली शाह आणि विजय वर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट ९ सप्टेंबर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर, मौनी रॉय, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नवे तर 'या' गोष्टीमुळे पटली, तपासात मोठा खुलासा

Maharashtra Live News Update : पुण्यात भाजपा कोअर कमिटीची महत्वाची बैठक; महापौर पदावर कोणाची वर्णी? सस्पेन्स कायम

Dhurandhar 2 : 'धुरंधर 2' चा टीझर कधी प्रदर्शित होणार? आदित्य धरने रणवीर सिंहच्या चित्रपटाबद्दल केला मोठा खुलासा

मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरिफ केला कमी, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी! लाडक्या बहि‍णींच्या खात्यात खटाखट ₹४५०० येणार, कारण आले समोर

SCROLL FOR NEXT