Ileana D'Cruz Leave Film Industry Instagram @ileana_official
मनोरंजन बातम्या

Ileana D'Cruz Leave Film Industry : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा अभिनयाला रामराम?; कारण आलं समोर

Ileana D'Cruz Latest News: इलियाना डिक्रूझ फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकणार अशी सध्या चर्चा सुरू आहे.

Chetan Bodke

Ileana D'Cruz Leave Film Industry

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana Dcruz) गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. इलियाना गेल्या काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलाची आई झाली आहे. सध्या ती तिच्या मुलासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. सध्या ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये, सक्रिय नसली तरी ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. मिळालेल्या माहितीनुसार, इलियाना डिक्रूझ फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकणार अशी सध्या चर्चा सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लग्नाच्या अगोदरच ती प्रेग्नेंट राहिल्यामुळे तिची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. दरम्यान, अभिनेत्रीने गरोदरपणाची बातमी ऐकल्यानंतर चार आठवड्यांच्या आत बॉयफ्रेंड मायकल डोलनसोबत लग्न केले.

लग्नानंतर काही काळातच इलियानाने पतीचा चेहरा चाहत्यांना दाखवला. तिने ऑगस्ट महिन्यामध्ये गोंडस बाळाला जन्म दिला. सध्या ती आपल्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इलियाना सध्या यूएसएला जाण्याचा विचार करत आहे. त्यामुळेच ती कोणत्याही चित्रपटाची ऑफर स्वीकारत नाहीये.

फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी परदेशात जात असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्सने दिली आहे. त्यामुळे आता ती पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र याविषयी तिने स्वत: काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इलियानाच्या कामाबद्दल बोलायचे तर, 'बर्फी', 'रुस्तम', 'रेड', 'मैं तेरा हिरो' आणि 'पागलपंती' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. तिने आपल्या फिल्मी कारकिर्दिची सुरुवात वयाच्या १९ व्या वर्षापासून केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

Maharashtra News Live Update: चांदवडच्या राहुडमध्ये घरफोडी, लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास

SCROLL FOR NEXT