Sameer Wankhede: सर्वशक्तिमान तुमच्या सोबत असेल तर... क्रांतीची पतीला साथ Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Sameer Wankhede: सर्वशक्तिमान तुमच्या सोबत असेल तर... क्रांतीची पतीला साथ

वानखेडे सध्या एनसीबीचे वादग्रस्त अधिकारी बनले आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप होत असताना त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर ही मात्र पतीच्या पाठिशी ठामपणे उभी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे विभागीय अधिकारी समीर वानखेडे हे दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहेत. राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे ते सध्या एनसीबीचे वादग्रस्त अधिकारी बनले आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप होत असताना त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर ही मात्र पतीच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. (If the Almighty is with you...kranti supports the her husband)

हे देखील पहा -

क्रांती रेडकरने तिच्या पतीला आत्मविश्वास देत सत्याचाच विजय होईल असं ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये क्रांती लिहीते की, ''जेव्हा तुम्ही समुद्राच्या भरतीत पोहता, तेव्हा ते तुम्हाला बुडवू शकते, परंतु जर सर्वशक्तिमान तुमच्या सोबत असेल तर, हे जग भरतीसाठीही मोठे नाही. कारण, फक्त तोच सत्य जाणतो. सुप्रभात, सत्यमेव जयते." असं ट्विट करत क्रांतीने तिच्या पतीची पाठराखण करत सत्याचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केलाय.

समीर वानखेडे यांनी २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील कार्डीलिया क्रुजवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला त्याब्यात घेतले होते. तेव्हापासून आर्यन जेलमध्येच आहे. याबाबत मंत्री नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. यात अजून भर म्हणजे एनसीबीकडून ड्रग्जप्रकरणी केलेल्या कारवायांमध्ये तोडपाणी होत असल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. एनसीबीचे पंच असलेले प्रभाकर साईल यांनीच हा गौप्यस्फोट केल्याने एनसीबीच्या अडचणी वाढल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

आंदोलकांना देशभरातून मदतीचा हात, जंतर मंतरवर 'ऑनलाईन' लंगर

SCROLL FOR NEXT