IAS Tina Dabi Wedding Dance Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

'ये तेरी चांद बलियां..' गाण्यावर IAS टीना डाबींनी धरला ठेका; पाहा व्हिडिओ

आयएएस टीना डाबी यांचा लग्नात डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) आणि आयएएस प्रदीप गावंडे (IAS Dr. Pradeep Gawande) नुकतेच विवाहबंधनात अडकलेत. जयपूरमधील (Jaipur) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच टीना डाबी यांची लहान बहीण आयएएस रिया डाबी हिने लग्नाचा एक व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.या व्हिडिओमध्ये टीना यांच्या लग्नाची, मेहंदी, संगीत सोहळ्याची झलक दाखवण्यात आली आहे. (IAS Tina Dabi And Dr Pradeep Gawande's Wedding Dance Viral Video)

व्हिडिओमध्ये असलेल्या पहिल्या फोटोत टीना डाबी प्रदीप गावंडे यांच्यासोबत पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत टीना लाल रंगाच्या लेहेंग्यात मेहेंदी लावताना दिसत आहे. इतकंच नाही तर, टीना लहान बहीण रिया आणि मित्रांसोबत 'ये तेरी चांद बलियां' गाण्यावर डान्सही करताना दिसून येत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ रिया दाबीने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला जवळपास एक लाखाहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

२० एप्रिल रोजी जयपूर शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये टीना आणि प्रदीप यांनी लग्न केलं. टीना आणि प्रदीप यांचा विवाह सोहळा बौध्द पध्दतीनं झाल्याचा अंदाज काही नेटकऱ्यांनी व्यक्त केलाय. टीना दाबीचं हे दुसरं लग्न आहे. २०१८ च्या सुरुवातीला टीना यांनी २०१५ चा दुसरा UPSC टॉपर अतहर आमिर खानशी लग्न केलं होतं. मात्र, २ वर्षांनंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यात आला होता. आता टीनानं त्यांच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. प्रदीप हे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे सुपूत्र आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SaamTV Exit Poll: सांगलीचं मैदान भाजपनं मारलं; एकहाती सत्ता राहणार?

Municipal Elections Voting Live updates: वसई पूर्वेच्या वसंत नगरीतील सेठ विद्यामंदिर मध्ये भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

Saam Tv Exit Poll: नाशिकमध्ये फडकणार महायुतीचा झेंडा? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

Saam TV exit poll: धुळ्यामध्ये भाजपाची एकहाती सत्ता येणार? पाहा एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात

Saam Tv Exit Poll: मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष, ठाकरेंना किती जागा? पाहा सत्तेत कोण येणार

SCROLL FOR NEXT