I can't work with Akshay kumar said by shahrukh khan
I can't work with Akshay kumar said by shahrukh khan  Saam tv
मनोरंजन बातम्या

अक्षय कुमारसोबत काम करू शकत नाही; किंग खानचा खुलासा ऐकून चाहते थक्क

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा 'किंग खान' म्हणजेच शाहरुख खान(ShahRukh Khan) आणि 'बॉलिवूडचा खिलाडी' म्हणजेच अक्षय कुमारची(Akshay Kumar) जोडी १९९७ साली 'दिल तो पागल है' चित्रपटात पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर या दोघे कोणत्याच चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. त्यांच्या चाहत्यांना त्यांना पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर पाहायचे आहे. पण कदाचित चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकेल की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. कारण 'दिल तो पागल है' नंतर किंग खानने अक्षयसोबत काम करणार नसल्याचे ठरवले होते. यामागची कारणे काय आहेत, हे शाहरुख खाननेच एका मुलाखतीत सांगितले होते.

बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचे एकापेक्षा एक चित्रपट सुपरहिट होत होते. त्याचवेळी शाहरुख खानचे चाहते 'झिरो' चित्रपटानंतर शाहरुख खानच्या कमबॅकची वाट पाहत होते. त्यावेळी एका मुलाखतीत किंग खानला विचारण्यात आले होते की, 'दिल तो पागल है' रिलीज होऊन २४ वर्षे झाली तरी तुम्ही पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसला नाहीत, याचं कारण काय? तेव्हा किंग खानने या मुलाखती दरम्यान यामागच्या कारणांचा खुलासा केला होता.

शाहरुखने उत्तर देत म्हटले की, 'मी अक्षयसोबत काम करू शकत नाही, यात मी काय करू शकतो. अक्षय कुमार जितक्या लवकर उठतो, तितक्या लवकर मी उठू शकत नाही. मी झोपायला जातो, तोपर्यंत त्यांची उठायची वेळ झालेली असते. त्याचा दिवस खूपच लवकर सुरू होतो. मी कामाला लागेपर्यंत तो बॅग भरून घरी जायला तयार असतो'. शाहरुख पुढे म्हणाला की, 'मी या बाबतीत थोडा वेगळा आहे. रात्री उशिरापर्यंत शूटिंग करायला आवडणारे माझ्यासारखे फारसे लोक तुम्हाला सापडणार नाहीत'.

एकीकडे अक्षय कुमार 'रक्षाबंधन' 'राम सेतू', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'सेल्फी' 'गोरखा' आणि 'हेरा-फेरी ३' यांसारख्या चित्रपटांमध्ये लवकरच झळकणार आहे, तर दुसरीकडे शाहरुख खान 'पठाण', 'डंकी' आणि 'जवान' या आगामी चित्रपटांसह ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एन्ट्री करायला सज्ज झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT