Hruta Durgule Saam Tv
मनोरंजन बातम्या

महाराष्ट्राची क्रश हृताचा अंगावर काटा आणणारा 'अनन्या'चा ट्रेलर प्रदर्शित

येत्या २२ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Shivani Tichkule

मुंबई - मराठमोळी अभिनेत्री (Actress) हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्राची क्रश असलेली ही अभिनेत्री सध्या बरीच चर्चेत आहे. छोट्या पडद्यावर आपल्याअभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता हृता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आधी लग्न, त्याचबरोबर सोशल मीडियावर २.५ मिलियन फॉलोअर्स आणि त्यानंतर लागोपाठ झालेल्या चित्रपटांच्या घोषणा यामुळे हृता दुर्गुळे सध्या प्रचंड आनंदात आहे.

त्यानंतर लवकरच ती अनन्या या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या २२ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!', असे म्हणणाऱ्या 'अनन्या'च्या जिद्दीचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. एका अपघातात तिचे दोन्ही हात जातात. मात्र 'अनन्या' पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर कशी उभी राहते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!' हा खूप मोलाचा सल्ला देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. तर 'अनन्या'ची व्यक्तिरेखा हृता दुर्गुळे साकारत आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया 'अनन्या'चे निर्माते आहेत.

हृता फुलपाखरू मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने स्टार प्रवाहच्या दुर्वा मधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. झी युवाच्या फुलपाखरूमधील तिच्या वैदेहीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्ध झाली. २०२१ मध्ये तिने सोनी मराठीचा सिंगिंग रिॲलिटी शो सिंगिंग स्टार होस्ट केला. सध्या ती झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत दीपिका देशपांडेची मुख्य भूमिका साकारत आहे. नुकतेच हृता दुर्गुळेने तिचा बॉयफ्रेंड टीव्ही आणि चित्रपट दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत लग्न केले.

हृता दुर्गुळेच्या 'दादा एक गूड न्यूज आहे' या नाटकाचे सध्या रंगभूमीवर जोरदार प्रयोग होत आहे. त्यानंतर आता हृताचा 'अनन्या' आणि 'टाईमपास 3' हे दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृताचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची प्रतीक्षा करत आहेत. 'टाईमपास 3' हा चित्रपट 3 जूनला प्रदर्शित होणार आहे. तर 'अनन्या' चित्रपट 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

२०१९ मध्ये तिचे मराठी टेलिव्हिजनमधील सर्वात आकर्षक महिला म्हणून वर्णन केले गेले. ती सर्वात लोकप्रिय मराठी टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक आहे. हृता मराठी इंडस्ट्रीमध्ये "महाराष्ट्राची क्रश" म्हणून ओळखली जाते. २०२२ मधील टॉप ५ मराठी टेलिव्हिजन अभिनेत्रींमध्ये ती पहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT