Hrithik Roshan and Saba Azad  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hrithik Roshan Saba Azad: हृतिक रोशनने दिल्या गर्लफ्रेंड सबा आझादला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

हृतिकने सबाचे आभार मनात तिचे त्याच्या जीवनात असणे किती महत्वाचे आहे हे देखील सांगितले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Saba Azad Birthday Special: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सबा आझादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोनी लिव्हवरील रॉकेट बॉईज या वेबसीरीजमध्ये सबा दिसली होती. सबा 37 वर्षांची झाली आहे. हृतिक आणि सबा अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत. करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत जेव्हा ते हातात हात घालून दिसले तेव्हा ते डेट करत असल्याचे निश्चित झाले.

हृतिकने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत सबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तिच्या एका स्टेज शोमधील तिचा फोटो हृतिकने शेअर केला आहे. फोटोमध्ये सबाने तिच्या हातात माईक धरला आहे, ती तिच्या या भूमिकेत मग्न झालेली दिसत आहे. या फोटोला हृतिकने कॅप्शन देखील दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "तुझी लय, तुझा आवाज, तुझे हृदय.. आणि हो तुझे अमेझिंग मन.. तू मेलडी इन मोशन गर्ल आहेस. "

हृतिकने सबाचे आभार मनात तिचे त्याच्या जीवनात असणे किती महत्वाचे आहे हे देखील सांगितले आहे. तसेच त्याने एका खास शैलीत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Birthday)

हृतिक आणि सबाचे चाहते नेहमीच त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात. हृतिक आणि सबाची सोशल मीडियावरील केमिस्ट्री देखील फॅन्सला भरपूर आवडते. इंस्टाग्रामच्या माध्यमातून हृतिक आणि सबा एकमेकांवरील प्रेम नेहमीच व्यक्त करताना दिसतात. सबा रोशन कुटुंबासोबत अनेकदा वेळ घालवताना दिसते. तसेच सबाचे हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खानसोबतही चांगले संबंध आहेत. (Social Media)

सबा 'फील्स लाइक इश्क' आणि 'रॉकेट बॉईज'मध्ये दिसली होती. तिने अलिकडेच तिच्या 'सॉंग्स ऑफ पॅराडाईज' चित्रपटाचे शूट पूर्ण केले, ज्यामध्ये ती सोनी राझदानसोबत दिसणार आहे.

दरम्यान, हृतिक पुढे दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्यासोबत 'फायटर' या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटामध्ये दीपिका आणि हृतिक पहिल्यांदा ऑन-स्क्रीन येणार आहेत. (Hrithik Roshan)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकीय भूकंपाची चाहुल लागताच मुख्यमंत्र्यांनी टाकला मोठा डाव; विरोधकांना विजय यांचा 'चेकमेट'

How To Protect Skin In AC: दिवसभर ACमध्ये बसता? त्वचा ड्राय पडू नये म्हणून करा 'या' ७ गोष्टी

Chilli Pickle : पोळी-भाकरीसोबत लागेल भन्नाट! अशा पद्धतीने बनवा हिरव्या मिरचीचे लोणचे

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

IAS Officer Transfer: मोठी बातमी! १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे झाली नियुक्ती?

SCROLL FOR NEXT