मनोरंजन बातम्या

Koi Mil Gaya Released : जादू परत येतोय! २० वर्षांनी कोई मिल गया पुन्हा प्रदर्शित; जाणून घ्या केव्हा आणि कुठे पाहता येणार चित्रपट?

Pooja Dange

Hrithik Roshan Movie Koi Mil Gaya Re-released : रोहित आणि जादू मोठ्या पडद्यावर पार्टनर आहेत. कोई... मिल गया, या चित्रपटाने भारताला पहिला साय-फाय चित्रपट दिला. या चित्रपटातील एक गोड, एक्सट्राऑर्डिनरी क्रिएचर जादूशी आपली ओळख झाली.

8 ऑगस्ट रोजी या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हृतिक रोशन- रेखा- प्रीती झिंटा स्टारर चित्रपट पुन्हा एकदा, दिल्ली आणि मुंबई सारख्या 30 शहरांमध्ये 4 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

कोई मिल गया चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन, चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असल्याने नॉस्टॅल्जिक झाले. “आमच्या चित्रपटाच्या केंद्रस्थानी, एका मतिमंद मुलगा, त्याचा प्रवास, त्याची आई, मैत्रिणी निशा हे सगळं होत.

निशा ही मॅच्यूर मुलगी आहे जी रोहितला समजून घेईल आणि त्याला तो जसा आहे तास स्वीकारेल, ही भावनिक कथा होती. यानंतर कथेत जादू येतो, डोळ्यातून भावना व्यक्त करणार आणि डोळ्यातील भावना समजणारा. Koi..Mil Gaya चित्रपटामध्ये खूप कमी VFXचा वापर झाला आहे, फक्त स्पेसशिपसाठी, बाकी सर्व काही ग्राउंडवर्क होते. चित्रपटासाठी DI देखील केले नव्हते," असे राकेश रोशन यांनी सांगितले.

चित्रपटाचा इम्पॅक्ट इतका होता की आजही त्यावर मीम्स बनवले जातात. 73 वर्षीय चित्रपट निर्माते म्हणतात की, "मी जेव्हा जेव्हा उन्हाळ्यात 'धूप' किंवा जगभर दिसणारे कथित एलियन किंवा आकाशातून ऐकू येणारी विचित्र आवाज ऐकतो तेव्हा जादूबद्दल कोणी ना कोणी बोलतच असत हे मी पाहिलंय.

कोणताही चित्रपट काळाच्या कसोटीवर उतरण्यासाठी त्याच्या प्रेक्षकांशी घट्ट भावनिक बंध असणे आवश्यक आहे. मला असे वाटते की कोई.. मिल गया मुलांशी जोडलेला आहे, जी मूळ आता मोठी झाली आहेत, काहींना आज स्वतःची मुले आहेत. 'मेरे पापा से सीख कर आया हूँ', 'मुझे कुछ दिख नहीं दे रहा है मां', 'हैला जादू' इत्यादी संस्मरणीय संवादांत भावना व्यक्ती केल्या जातात आणि त्या मीम्समध्ये वापरल्या जातात."

हृतिकला त्याच्या अभिनय कारकिर्दीला अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत, एका विशेष दिव्यांग व्यक्तीच्या भूमिकेसाठी अप्रतिम प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला होता. राकेश रोशनला २० वर्षांनीही प्रेक्षकांशी कनेक्टेड वाटते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT