Gautami Patil  saam Tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil Lavani Fees: गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी किती पैसे घेते? जाणून चक्रावून जाल

Gautami Patils statement: महाराष्ट्राच्या तरुणांमध्ये गौतमी पाटीलची खूप क्रेझ आहे. सबसे कातील म्हटलं तर तरुणमंडळी गौतमी पाटील असा आवाज साद घालतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gautami Patil's Latest news :

महाराष्ट्राच्या तरुणांमध्ये गौतमी पाटीलची खूप क्रेझ आहे. सबसे कातील म्हटलं तर तरुणमंडळी गौतमी पाटील अशी साद घालत असतात. गौतमी अनेकांची ड्रिमगर्ल बनलीय. तिच्या कार्यक्रमाला लाखोंची संख्येने प्रेक्षक येत असतात. गौतमी लाखों तरुणांच्या हृदयाची धकधक बनलेली आहे. काही दिवसापूर्वी तिच्या साधेपणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला तो अनेकांच्या पसंतीस उतरला होता. (Latest News)

तसेच तिला साथीदारपण साधा हवा. तिला जीवन साथीदार कसा असा प्रश्न विचारल्यानंतर तिनं खूप साधी सरळ अपेक्षा सांगितली होती. जिवाला जीव लावणारा साथीदार आपल्याला हवा असं म्हटल्यानंतर तिच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर लग्नाचा प्रस्ताव दिला होता. अशी गौतमी पाटील आपल्या एका कार्यक्रमासाठी किती रुपये घेते असा प्रश्न अनेकजण विचारतात. स्वत: गौतमी पाटीलनं तिच्या कार्यक्रमाला ती किती रुपयांची सुपारी घेते याचं उत्तर दिलंय.

गौतमी एका वाहिनीच्या कार्यक्रमात आली होती. त्या कार्यक्रमात बोलताना तिने त्याची खुलासा केलाय. मी एका कार्यक्रमासाठी लाखोंच्या सुपाऱ्या घेते या सर्व अफवा आहेत. मला जो कार्यक्रम मिळतो त्या ठिकाणी जाते असं गौतमी पाटील म्हणाली. मी सुपारीसाठी लाखो रूपये घेते या अफवा आहेत. ज्यांनी माझ्यावर हा आरोप केला त्यांचाही गैरसमज झाला असावा. मला कोणाच्याही पोटावर पाय द्यायचा नाही. तिला स्वतःला दिवसाला १००ते २०० फोन येत असल्याचं तिनं सांगितले. परंतु ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी कार्यक्रमाला जात असते.

या कार्यक्रमात गौतमीनं वडिलांच्या आणि तिच्या नात्यावर भाष्य केलं. मी आठवीला असताना वडिलांना पाहिलं होतं. वडील ड्रिंक करायचे. रोजच ड्रिंक करायचे. त्यांनी काय केले ते विसरुन गेले. आता ते नाहीत. ते व्यवस्थित राहिले नाहीत. त्यांना गावाला जायचे होते. आमच्यासोबत त्यांना राहायचे नव्हतं. आईच सगळं काम करायची. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ती काम करायची. तिनेच माझे पालनपोषण केलं असं गौतमी म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT