Housefull 5 Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Housefull 5 Box Office Collection : ९व्या दिवशी 'हाऊसफुल ५'ची बंपर कमाई, अक्षय कुमारच्या चित्रपटानं कितीचा गल्ला जमवला?

Housefull 5 Box Office Collection Day 9: अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5' चित्रपटाने शनिवारी बंपर कमाई केली आहे. ज्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झालेली आहे.

Shreya Maskar

'हाऊसफुल 5' (Housefull 5 ) चित्रपट 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'हाऊसफुल 5' हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. 'हाऊसफुल 5'मध्ये कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे. अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल 5'मध्ये रितेश, अभिषेक, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, संजय दत्त , फरदीन खान आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांनी धुमाकूळ घातला आहे.

'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवस 9

'हाऊसफुल 5' चित्रपटाने 9व्या दिवशी कलेक्शनमध्ये 140 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता चित्रपट लवकरच 150 कोटींचा टप्पा पार करणार आहे. 'हाऊसफुल 5'च्या कलेक्शनमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. मात्र चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी बाजी मारली आहे. 'हाऊसफुल 5'ने दुसऱ्या शनिवारी म्हणजे रिलीजच्या 9व्या दिवशी 9 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता पर्यंत 'हाऊसफुल 5' ने किती (Housefull 5 Box Office Collection ) कोटीं कमावले जाणून घेऊयात.

  • दिवस पहिला - 24 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 31 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 32.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 13 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 11.25 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 8.5 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 7 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 6 कोटी रुपये

  • नववा दिवस - 9 कोटी रुपये

  • एकूण - 142.25 कोटी रुपये

ओटीटी रिलीज

'हाऊसफुल 5' दोन वेगवगेळ्या क्लायमॅक्ससाठी ओळखला जातो. 'हाऊसफुल 5'चा बजेट तबल 225 कोटी रुपये आहे. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली असून दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. 'हाऊसफुल 5'च्या गाण्यांनी सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'हाऊसफुल 5' चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

'हाऊसफुल 5' चे ओटीटी राइट्स अमेझॉन प्राइम व्हिडिओनं खरेदी केले आहेत.अद्याप 'हाऊसफुल 5' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची डेट जाहीर करण्यात नाही आली आहे. मात्र चित्रपट थिएटर रिलीजच्या 6 ते 8 आठवड्यात अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल असे बोले जात आहे. जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला 'हाऊसफुल 5' ओटीटीवर पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भिवंडीत तरुणाचा साप गळ्यात घालून स्टंट; व्हिडिओ व्हायरल

PM मोदी म्हणाले पेट्रोल-डिझेलची बचत करा; पण देशात किती दिवस पुरेल इतका साठा? सरकारची अधिकृत आकडेवारी

आधी बायकोच्या बॉयफ्रेंडची हत्या केली, नंतर प्रायव्हेट पार्ट जाळला; विवाहबाह्य संबंधामुळे नवऱ्याचं हादरवणारं कृत्य

Gold Rate Today: सोनं ₹१५०० तर चांदी १० हजारांनी महागली; सुवर्णनगरीतील १ तोळ्याचे दर किती? वाचा सविस्तर

Old Clothes Reuse Ideas: टाकाऊपासून टिकाऊ! जुन्या जीन्स आणि टी- शर्टपासून घरच्या घरी बनवा स्टायलिश बॅग्स

SCROLL FOR NEXT