Honey Singh Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Honey Singh: 'जिंदगी एक खूबसूरत...'; हनी सिंग करतोय मॉडेल डेट, व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण

Honey Singh Post: प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. मोरोक्कन मॉडेल एमा बकरसोबतच्या डेटिंगच्या अफवांदरम्यान त्याची एक पोस्ट व्हायरल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Honey Singh: प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. मोरोक्कन मॉडेल एमा बकरसोबतच्या डेटिंगच्या अफवांदरम्यान, हनी सिंगहने 'जिंदगी एक खूबसूरत सफर है' असे लिहून एक गूढ पोस्ट शेअर केली आहे, या पोस्टमुळे त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना नव्याने उधाण आले आहे.

एमा बकरसोबत वाढदिवस साजरा केला

हनी सिंगहने एमा बकरसोबत वाढदिवस साजरा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्याने एमा बकरला 'क्लिओपेट्रा' असे संबोधले असून, 'लव्ह यू' असेही लिहिले आहे. या पोस्टमुळे त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या असून चाहते वेगवेगळे तर्क लावत आहेत.

IIFA 2024 मध्ये 'मिस्ट्री गर्ल'सोबत हजेरी

2024 मध्ये अबू धाबी येथे झालेल्या IIFA पुरस्कार सोहळ्यात हनी सिंग एका 'मिस्ट्री गर्ल'सोबत हातात हात घालून रेड कार्पेटवर दिसला होता. आता या 'मिस्ट्री गर्ल'ची ओळख एमा बकर अशी सांगितली जात आहे. दोघांनी एकत्र फोटो काढून घेतल्यामुळे त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चा तेव्हापासून सुरु झाल्या होत्या.

हनी सिंगहचे वैयक्तिक आयुष्य

हनी सिंगने 2011 मध्ये शालिनी तलवारशी विवाह केला होता. मात्र, 2023 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर हनी सिंगचे नाव टीना थडानीसोबत जोडले गेले होते. आता एमा बकरसोबतच्या त्याच्या सततच्या पोस्टमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

'जिंदगी एक खूबसूरत सफर है' - हनी सिंगह

हनी सिंगहने आपल्या पोस्टमध्ये 'जिंदगी एक खूबसूरत सफर है' असे लिहून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. त्याच्या या पोस्टमुळे चाहते कमेंट करुन त्याच्या लव्ह लाईफबद्दल विविध प्रश्न विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT