Brazilian singer Ayres Sasaki Dies Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ayres Sasaki Death : धक्कादायक ! सुप्रसिद्ध गायकाचा लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान मृत्यू, भिजलेल्या चाहत्याने मिठी मारली अन्...

Brazilian singer Ayres Sasaki Dies : रॉक गायक आयरेस सासाकी याचा मृत्यू झाला आहे. लाईव्ह शो दरम्यान गाणं गात असताना ह्या गायकाचा मृत्यू झालेला आहे.

Chetan Bodke

हॉलिवूड इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. ब्राझिलियाई रॉक गायक आयरेस सासाकी याचा मृत्यू झाला आहे. लाईव्ह शो दरम्यान गाणं गात असताना ह्या गायकाचा मृत्यू झालेला आहे. भिजलेल्या चाहत्याने मिठी मारल्यामुळे ३५ वर्षीय गायकाला त्याचे प्राण गमवावे लागले आहेत.

ब्राझिलियन न्यूज पोर्टल, द सन आणि द मिररच्या वृत्तानुसार, ब्राझिलियाई रॉक गायक आयरेस सासाकी याचा मृत्यू शनिवारी १३ जुलै रोजी झालेला आहे. आयरेस सासाकी ब्राझीलमधील सेलिनोपोलिस मधील सोलर हॉटेलमध्ये, एक म्युझिक लाईव्ह कॉन्सर्ट होता. त्यावेळी त्याला त्याचा एक भिजलेला चाहता मिठी मारायला स्टेजवर आला होता. तो चाहता आयरेसला मिठी मारण्यासाठी जात असताना स्टेजवरील वायरमधून विजेचा करंट सप्लाय झाला आणि यातच गायक आयरेस सासाकीचा मृत्यू झाला. घडलेली घटना ऐकून त्याच्या जगभरातील चाहत्यांना धक्का बसला असून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे.

आयरेस सासाकी हा ब्राझीलमधील सुप्रसिद्ध सिंगर आहे. त्याचा चाहतावर्ग जगभरातही आहे. त्याच्या म्युझिक कॉन्सर्टसाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यातीलच एक चाहता आयरेसला भेटण्यासाठी स्टेजवर आला होता. गायकाला त्याच्या चाहत्याला दुखवायचं नव्हतं. म्हणून त्याने त्याला मिठी मारली. पण काहीतरी विपरीतच घडलं. अद्याप घटनेबद्दल कोणतीही सविस्तर माहिती मिळालेली नसून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. घडलेल्या प्रकारानंतर सासाकी यांच्या कुटुंबीयांसह त्याच्या मित्रमंडळी आणि फॅन्सवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टसाठी सासाकीची काकीदेखील उपस्थित होती. "आम्हाला एवढंच माहीत आहे की त्याचा शो एका ठराविक वेळेसाठी होता. पण नंतर पुढे त्याच्या शोचा वेळ वाढवण्यात आला होता. त्यावेळी जे लोक त्याच्याबरोबर होते, त्यांना संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. हे सगळं कसं घडलं, याबाबत जाणून घेतल्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ",अशी प्रतिक्रिया सासाकीच्या काकीने दिली आहे. ११ महिन्यांपूर्वीच सासाकीचं लग्न झालं होतं. अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त ऐकून त्याच्या पत्नीची फार वाईट अवस्था झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT