Khloe Kardashian Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्याला जाताना प्रसिद्ध अभिनेत्रीचा पाय घसरला; पडता पडता वाचली, पाहा Video

Khloe Kardashian Viral Video : सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर किम कार्दशियन, ख्लो कार्दशियनने उपस्थिती लावली. दोघीही बहिणींचे लग्नातील सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Chetan Bodke

बॉलिवुडसह अनेक हॉलिवूड कलाकार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी उपस्थित होते. हे कपल १२ जुलै रोजी मुंबईमध्ये लग्न बंधनात अडकले. यांच्या लग्नासाठी अनेक सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर किम कार्दशियन, ख्लो कार्दशियनने उपस्थिती लावली. यावेळी कार्दशियन बहिणींना भेटण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उत्सुक होते. सध्या कार्दशियन बहिणींचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशातच सध्या इन्स्टाग्रामवर ख्लो कार्दशियनचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पडता पडता वाचली, असं दिसतंय. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

‘विरल भयानी’ नावाच्या पापाराझी इन्स्टा चॅनलवर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. लग्नासाठी किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियन यांनी खास आऊटफिट कॅरी केला होता. यावेळी दोघींनीही खास डिझाईन केलेला लेहेंगा वेअर केलेला होता. दोघीही घागरा लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होत्या. काल (१३ जुलै) अनंत- राधिका यांचं लग्नानंतर खास ‘शुभ आशीर्वाद’ सोहळा काल होता, या इव्हेंटसाठी कार्दशियन बहिणींनी हा खास इव्हेंट केला होता. अनंत- राधिकाच्या लग्णानिमित्त या दोघीही पहिल्यांदाच भारतात आल्या आहेत. यावेळी दोघींचंही भारतात आल्यानंतर भारतीय पद्धतीने स्वागत करण्यात आले.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, कार्दशियन बहि‍णी ताज हॉटेलमधून ‘शुभ आशीर्वाद’ सोहळ्यासाठी जाण्यास बाहेर पडताना दिसतायत. तेवढ्यात ख्लोईचा पाय घसरतो आणि ती पडता पडता वाचते. चालता चालता ख्लोचा पाय घसरल्यामुळे तिने स्वतः ला पटकन सावरलं. शिवाय तिच्या आजुबाजूला असलेल्या सुरक्षा रक्षकांनीही तिला पटकन सावरलं. ख्लो कार्दशियनचा पडतानाचा व्हिडिओ पाहून नेटकरी सध्या तिला तुफान ट्रोल करीत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

११ जुलैला संध्याकाळी किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियन भारतात आले. भारतात आल्यानंतर दोघींनीही मुंबईमध्ये, ऑटो रिक्षातून मुंबईच्या रस्त्यावर सफर केली. गेल्या काही दिवसांपूर्वी किम कार्दशियनने ऑटो रिक्षासोबत फोटोशूट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण ते तिने नाही केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT