Actor Death: हॉलीवूड चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता ख्रिश्चन कझिन्स (Christian Cousins) याचे वयाच्या ४३ व्या वर्षी निधन झाले आहे. 'Kindergarten Cop' आणि 'Knots Landing' यांसारख्या लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मनोरंजनविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ख्रिश्चनच्या सावत्र भावाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्याच्या निधनाची माहिती दिली.
ख्रिश्चन कझिन्सच्या निधनाची माहिती त्याचा सावत्र भाऊ जोनास रोझर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली. त्याने आपल्या पोस्टमध्ये ख्रिश्चनच्या आठवणींना उजाळा दिला. ख्रिश्चन आणि त्याचा जुळा भाऊ जोसेफ 'जोई' कझिन्स हे दोघेही त्याचे भाऊ होते. दोघांनी बालकलाकार म्हणून मनोरंजनविश्वात काम केले होते. जोनासने सांगितले की, ख्रिश्चन काही काळापासून लिव्हिरच्या आजाराने त्रस्त होता. त्याच्या आजारपणामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ख्रिश्चन आता वेदनांपासून मुक्त झाला आहे, असे म्हणत त्याने भावाला श्रद्धांजली वाहिली.
ख्रिश्चन कझिन्सला १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'Kindergarten Cop' या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्याने आपला जुळा भाऊ जोसेफ याच्यासोबत डॉमिनिक पामिएरी ही भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता अर्नोल्ड श्वार्झनेगर मुख्य भूमिकेत होता. दोन्ही भावांनी आलटून-पालटून डॉमिनिकची भूमिका साकारली होती.
ख्रिश्चन आणि त्याचा जुळा भाऊ जोसेफ यांनी अगदी लहान वयात अभिनयाला सुरुवात केली होती. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी 'Highway to Heaven' या मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 'Knots Landing' या लोकप्रिय मालिकेत दोघांनी बॉबी इविंगची भूमिका साकारली. याशिवाय 'Critters 3', 'Twin Sitters', 'Empty Nest' आणि 'Eerie, Indiana' यांसारख्या चित्रपट आणि मालिकांमध्येही त्यांनी काम केले. १९९५ मध्ये 'Twin Sitters' या चित्रपटानंतर ख्रिश्चनने अभिनयक्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.