Kushal Badrike  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kushal Badrike : "वो स्त्री है..."; कुशल बद्रिकेच्या बायकोने होळीतून काढला नारळ, पाहा VIDEO

Kushal Badrike Holi Video : अभिनेता कुशल बद्रिकेने होळीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कुशलची बायको पेटत्या होळीतून नारळ काढताना दिसत आहे.

Shreya Maskar

आज देशभरात होळीचा सण साजरा केला जात आहे. धुळवडीच्या रंगात लोक रंगली आहेत. होळी (Holi 2025) हा रंगांचा सण आहे. अनेकजण या सणाची आतुरतेने वाट पाहतात. कलाकार मंडळी देखील होळीची मजा घेताना पाहायला मिळतात. धुळवडीच्या आधी एक दिवस होलिका दहन केले जाते. होळी पेटवून आयुष्यातील नकारात्मतेला दूर करून सकारात्मकता स्वीकारली जाते. कलाकारांचे होळी सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सेलिब्रिटी चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळतात. अशात आता मराठी अभिनेता आणि कॉमेडियन कुशल बद्रिकेने (Kushal Badrike ) सोशल मीडियावर एक खास पोस्ट टाकली आहे. तो कुटुंबासोबत होळीचा सण साजरा करताना दिसत आहे. कुशलने इन्स्टाग्रामवर बायकोचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कुशलची बायको होलिका दहनाच्या दिवशी पेटत्या होळीतून नारळ काढताना दिसत आहे. हे पाहून कुशल थक्क झाला आहे.

कुशलच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कुशल बद्रिकेने व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "वो स्त्री है, कुछ भी कर सकती है" कुशल कायमच आपल्या कुटुंबासोबतच्या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो एक उत्तम अभिनेता आहे. त्याने आजवर आपल्या विनोदी शैलीने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य आणले आहे.

पेटत्या होळीतून नारळ काढण्याची कोकणात पद्धत आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे कुशलला लोकप्रियता मिळाली. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. कुशल आणि त्याची बायको सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT