Sasural Simar 2 Saam TV
मनोरंजन बातम्या

Sasural Simar 2: 'ससुराल सिमरका 2'होणार बंद; गंभीर कारण उघडकीस

मात्र आता ही मालिका बंद पडणार अशी माहिती समोर आली आहे.

Ruchika Jadhav

Sasural Simar 2: ससुराल सिमरका ही लोकप्रिय हिंदी मालिका बंद पडण्याच्या मार्गावर आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. २६ एप्रिल २०२१ पासून ही मालिका सुरू झाली. गेल्या दोन वर्षांत या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. मात्र आता ही मालिका बंद पडणार अशी माहिती समोर आली आहे. (Sasural Simar 2)

'ससुराल सिमरका २' या मालिकेचे आतापर्यंत ६१९ एपिसोड पूर्ण झाले आहेत. या मालिकेचा पहिला सीझन चाहत्यांनी अगदी डोक्यावर घेतला. मात्र आता ही मालिका फार लांबत चालली आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली. मालिकेचा टीआरपी सध्या मोठ्याप्रमाणावर घसरला आहे. त्यामुळे सदर मालिका बंद करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय.

'ससुराल सिमर का' ही मालिका सुरूवातीला फार जोरदार चालली. मालिकेला मिळालेलं प्रेम आणि प्रेक्षकांची मागणी लक्षात घेत निर्मात्यांनी या मालिकेचा पुढील सीझन दाखलवण्याचा निर्णय घेतला. हा सीझनने देखील सुरूवातीच्या काही आठवड्यांमध्ये मोठी कमाई केली.

सीझन २ मध्ये मालिकेमध्ये राधिका मुथुकुमार, अलिनाश मुखर्जी, तान्या शर्मा आणि करण शर्मा यांसारखे कलाकला होते. ही मालिका बंद होण्यामागे आणखीन एक मोठं कारण असल्याचं म्हटलं जात आहे. पहिल्या सीझनमध्ये सिमर हे पात्र अभिनेत्री दीपिका कक्करने साकारलं होतं. सिमर म्हणून दीपिका घराघरात पोहचली होती.

दुसरा सीझन सुरू झाला तेव्हा या मालिकेमध्ये सिमर हे पात्र राधिका मुथुकुमार या अभिनेत्रीला देण्यात आले. तिने देखील या पात्राला पूर्णपणे न्याय दिला. मात्र दुसऱ्या सीझनची घोषणा झाली तेव्हा पुन्हा एकदा दीपिकाला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सूक झाले होते. मालिका सुरू झाल्यावर दुसरी अभिनेत्री असल्याचे समजल्यावर अनेक व्यक्तींनी तेव्हाच या मालिकेकडे पाठ फिरवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer : आठ महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; पश्चिम विदर्भात सर्वात मोठा आकडा आला समोर

Satara Gadget: पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी खुशखबर, हैदराबादनंतर सातारा गॅझेट्ससाठी हालचालींना वेग

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

Thar Car Accident: महिलेने नवी कोरी थार घेतली, लिंबूवरून नेली अन् घडलं भयंकर, VIDEO होतोय व्हायरल

'Bigg Boss 19'च्या तिसऱ्या आठवड्यात होणार डबल एलिमिनेशन? 4 सदस्य झाले नॉमिनेट

SCROLL FOR NEXT