Hina Khan Hospitalized Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hina Khan Hospitalized : हिना खानवर उपचार सुरू, पहिली कीमोथेरेपी घेताना VIDEO केला शेअर; चाहते झाले इमोशनल

Hina Khan Hospital Video : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खान रुग्णालयात दाखल झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू झाले असून तिने पहिली कीमोथेरेपी घेतानाचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे.

Chetan Bodke

अभिनेत्री हिना खान काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेल्या हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे. अभिनेत्रीने याबद्दलचे वृत्त सोशल मीडियावरून दिली होती. अशातच आता अभिनेत्रीवर उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीचे हॉस्पिटलमधील काही फोटोज सध्या व्हायरल होत आहे.

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचा हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ती आनंदी दिसत आहे. गंभीर आजार होऊनही अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर स्माईल दिसत आहे. लवकरच अभिनेत्रीवर आता कीमोथेरेपीला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी ती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी अभिनेत्री एका अवॉर्ड इव्हेंटमध्येही गेली होती. या ठिकाणी जाऊन तिला आनंदही झालेला दिसत आहे. अभिनेत्रीने या दरम्यान, पापाराझींना फोटो पोजेसही दिल्या.

हिना खानने शेअर केलेल्या व्हिडिओवर मौनी रॉय, क्षिती जोग, जुही परमारसह अनेक सेलिब्रिटींनी तिला धीर दिला असून लवकरात लवकर बरी हो, अशी कमेंट केली आहे. हिना खान हिला "ये रिश्ता क्या कहलाता" मालिकेतून विशेष ओळख मिळाली आहे. या शोमध्ये तिने सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारली. तिच्या कॅरेक्टरचं नाव अक्षरा असं आहे. त्यानंतर हिना "बिग बॉस 11" मध्येही दिसली होती. बिग बॉसमुळेही तिला विशेष लोकप्रियता मिळाली. टेलिव्हिजन शो व्यतिरिक्त, तिने वेब शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिना खानने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीस यांच्या काकांना विश्वास

Maharashtra News Live Update: कणकवलीत अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक तपासणी

Maharashtra Freedom of Religion Act 2026: राज्यात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; उल्लंघन केल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Kavlya Fort : उंच शिखरावर उभा असलेला 'कावळ्यागड' कधी पाहिला का? सह्याद्रीत लपलेला सुंदर किल्ला

गॅस सबसिडीचे पैसे पाहायला गेली अन् बँक खात्यातील १०० कोटींची रक्कम पाहून महिला चक्रावली, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT