Hera Pheri 3 Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hera Pheri 3: बॉलिवूडमध्ये होणार पुन्हा 'हेरा फेरी'; राजू, श्याम आणि बाबू भैया खळखळून हसवणार

Hera Pheri 3 Update: सध्या अनेक मोठ्या चित्रपटांचे सिक्वेल येणार आहेत .भारतीय चित्रपटसृष्टीतील या कल्ट चित्रपटाचा तिसरा भाग बनवला जात आहे तो म्हणजे 'हेरा फेरी ३'. आता 'हेरा फेरी ३' बद्दल प्रियदर्शनने मोठी अपडेट दिली आहे.

Shruti Vilas Kadam

Hera Pheri 3: राजू, श्याम आणि बाबू भैया हे त्रिकूट चाहते पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हेरा फेरी ३ हा अशा मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे ज्याच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रियदर्शनने हा चित्रपट बनवण्याची घोषणा करत या कल्ट चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. पण ही अपडेट ऐकून चाहते निराश झाले आहेत.

प्रियदर्शनने काय अपडेट दिले?

अलीकडेच प्रियदर्शनने ईटीव्हीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मी काम सुरू करण्याचा विचार करत आहे. मी पुढच्या वर्षीपर्यंत हेरा फेरी ३ च्या पटकथेवर काम सुरू करेन. चित्रपटाचा तिसरा भाग बनवणे खूप आव्हानात्मक आहे, कारण या तिसऱ्या भागाकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. जर पुढच्या वर्षी चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू झाले, तर कल्पना करा की हा चित्रपट २०२७ पर्यंत प्रदर्शित होईल की नाही?

कठीण काम कोणते आहे?

खरंतर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन म्हणतात की लोकांना रडवणे किंवा घाबरवणे सोपे आहे. पण डबल मिनींगचा वापर न करता साध्या विनोदाने लोकांना हसवणे एक आव्हान आहे. जेव्हा मी हा चित्रपट कागदावर लिहीन, तेव्हा मला कळेल. की या चित्रपटात काय असेल पाहिजे."

अक्षयसोबत काम करण्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?

प्रियदर्शन आणि अक्षय कुमारची जोडी खूप चाहत्यांना खूप आवडते. या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यावर प्रियदर्शन म्हणाले की, अक्षय कुमारला माझ्यावर खूप विश्वास आहे. जेव्हा मी त्याला चित्रपटाची मूळ कथा सांगतो तेव्हा फार कमी वेळा अक्षय त्याबद्दल काही प्रश्न विचारतो. नाही तर त्याला कथा सांगितल्यावर आम्ही चित्रपटाचा शूटिंगला सुरुवात करतो आणि आमचे काम उत्तर रित्या संपवतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT