Hera Pheri 3 SAAM TV
मनोरंजन बातम्या

कॉमेडीचा Triple धमाका! राजू-श्याम-बाबूराव हे त्रिकूट एअरपोर्टवर स्पॉट, चाहते म्हणाले Hera Pheri 3

Akshay-Suniel-Paresh Spotted At Airport: 'हेरा फेरी' चित्रपटाचे कलाकार मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांना एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.

Shreya Maskar

सर्वांचा आवडता 'हेरा फेरी' चित्रपट पुन्हा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हेरा फेरी 3' ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.'हेरा फेरी 3' मध्ये (Hera Pheri 3) देखील अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी हे कॉमेडीचे त्रिकूट पाहायला मिळणार आहे.

अलिकडेच अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) , सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) मुंबईला एअरपोर्टवर (Mumbai Airport) स्पॉट झाले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एअरपोर्टवर तिन्ही सुपरस्टार कॅज्युअल लूकमध्ये पाहायला मिळाले. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने ब्लॅक शर्ट आणि ग्रे पँट परिधान केली होती. सनग्लासेस घालून अक्षय कुमार खरचं बॉस वाटत होता. अभिनेता सुनील शेट्टीने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले असून सनग्लासेस लावून कूल लूक केला होता. तर अभिनेता परेश रावल सिंपल लूकमध्ये पाहायला मिळाले. त्यांनी ब्लू प्रिंटेड शर्ट आणि नेव्ही ब्लू पॅन्ट घातली होती.

अक्षय, सुनील आणि परेश यांच्या एअरपोर्टवर व्हिडिओ चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. हे त्रिकूट तब्बल 24 वर्षांनंतर पुन्हा एकत्र स्पॉट झाले आहे. 'हेरा फेरी' हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. जेव्हा हे तिघं एअरपोर्टवर स्पॉट झाले तेव्हा चाहत्यांनी 'हेरी फेरी 3' चित्रपटाची मागणी केलेली पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमधून तिघांचे सुंदर बाँडिंग दिसून येत आहे. तेव्हा एका चाहत्यांनी विचारले की, हेरा फेरी पुन्हा?'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

SCROLL FOR NEXT