Hemangi Kavi Watch Adipurush Instagram
मनोरंजन बातम्या

Hemangi Kavi Watch Adipurush: चाळीशी पार केलेल्या हेमांगीला थिएटरमध्ये चित्रपट पाहताच आला नाही; पोस्ट करत मांडली खदखद

Hemangi Kavi Struggles: चाळीशीनंतर अनेकांना ही अडचण येते असं म्हणत हेमांगीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय.

Chetan Bodke

Hemangi Kavi Struggles After Age Of 40s: अभिनेत्री हेमांगी कवी मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री. हेमांगी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री नेहमीच विविध पोस्ट शेअर करत असते. कधी कुटुंबाकरिता तर कधी चित्रपटाविषयी अशा अनेक पोस्ट्स हेमांगी चाहत्यांसोबत शेअर करत असते. हेमांगी नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ती नवी पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

चाळीशीनंतर अनेकांना ही अडचण येते असं म्हणत तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. हेमांगी खरं तर चित्रपट पाहायला गेली होती, तिला तिथे एक अडचण आली. चित्रपटाचा आनंद तर घेता आला नाहीच पण, त्यापेक्षा तो चित्रपटही तितकाच वाईट होता असं तिने म्हणतेय.

हेमांगीने सोशल मीडियावर शेअर एक पोस्ट शेअर केली आहे, ती नुकतीच बहुचर्चित ‘आदिपुरूष’ चित्रपट पाहायला गेली होती. चित्रपट थ्रीडी असल्याने तिला काळ्या रंगाचा चष्मा देण्यात आला होता. तिला चित्रपट पाहायला गेल्यावर एक अडचण आली, ती म्हणजे वयाच्या चाळीशीनंतर तिला चष्मा लागला आहे. तिला तो लावून देखील काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. चित्रपट पाहतानाचा अभिनेत्रीने ती किती वैतागली याबद्दल सांगितले.

हेमांगी आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “चाळीशीनंतरच्या अडचणी' तर या व्हिडिओसोबत तिने लिहिलं, 'दुख, दर्द, पीडा! पण काही हरकत नाही या सगळ्यापेक्षा चित्रपट जास्त त्रासदायक होता. कोणता होता तो चित्रपट ओळखा पाहू?” अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने केली आहे. या पोस्टमध्ये चाहत्यांना तिने कोणता चित्रपट पाहण्यासाठी गेली होती, हे ओळखायला सांगत आहे.

हेमांगीच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स करत तिला चित्रपटाचं नाव सांगितलं. तर अनेकांनी तुझ्या सारखीच आमचीही समस्या आहे, असं म्हणत तिच्या समस्येला दुजोरा दिला.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे तर, सध्या तिच्या ‘जन्मवारी’ आणि ‘मन धागा धागा’ या नाटकामुळे चर्चेत आहे. सोबतच चित्रपटाबद्दल बोलायचे तर, ती गेल्या वर्षी काही चित्रपटांत ही झळकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT