Genelia Deshmukh Watch Heeramandi Web Series Saam Tv
मनोरंजन बातम्या

‘भव्य दिव्यता, रोमान्स अन् ड्रामा...;’ संजय लीला भन्साळीच्या ‘Heeramandi’ वेबसीरीजवर जेनेलिया काय म्हणाली?

Heeramandi First Review : संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ वेबसीरीजचा अभिनेत्री जेनेलिया देशमुखने चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केलेला आहे. इन्स्टाग्रामवर वेबसीरीजचा रिव्ह्यू शेअर केला आहे.

Chetan Bodke

Genelia Deshmukh Watch Heeramandi Web Series

भव्य दिव्य सेट, दर्जेदार कथानक आणि कलाकारांचा राजेशाही थाट यामुळे संजय लीला भन्साळी ‘हिरामंडी’ वेबसीरीजची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या वेबसीरीजचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करीत आहे. नुकतंच या वेबसीरीजच्या प्रीमियरचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अवघं बॉलिवूड इंडस्ट्री अवतरली होती. वेबसीरीज पाहिल्यानंतर अभिनेत्री जेनेलिया देशमुखने चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केलेला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. (Bollywood)

जेनेलियाने तिच्या इन्स्टास्टोरीवर संजय लीला भन्साळीसोबत एक फोटो शेअर केलेला आहे. स्टोरी शेअर करताना तिने 'हिरमंडी'चा रिव्ह्यूही तिने शेअर केलेला आहे. पोस्टमध्ये जेनेलिया म्हटली की, "मी आता ‘हिरामंडी’चे फक्त २ एपिसोड पाहिलेत. आता मला पुढचे एपिसोड पाहण्याची आणखी इच्छा आहे. खूप सुंदर अभिनय, सेटची भव्यदिव्यता, डोळे दिपवून टाकणारा सेट, खूप सुंदर कलाकृती. सर्वांनाच मंत्रमुग्ध केलंस. सर्वच स्टारकास्टचा सुंदर अभिनय आहे." अशी प्रतिक्रिया जेनेलियाने दिलेली आहे. (Bollywood Actress)

Heeramandi First Review

भव्य दिव्यता, रोमान्स आणि ड्रामा असलेल्या ‘हिरामंडी’ वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत, सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, आदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, अध्यायन सुमन, शेखर सुमन, फरदीन खान, संजीदा शेख आणि ताहा शाह बदुशा आहे. 'हीरमंडी : डायमंड बझार' ही सीरिज येत्या १ मे रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ओटीटीविश्वात पदार्पण करत आहेत. नेटफ्लिक्सवरील ही अत्यंत महागड्या वेबसीरिजपैकी एक वेबसीरीज असल्याचं बोललं जात आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT