Sapna Choudhary Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sapna Choudhary : हरियाणवी डान्सर सपना चौधरी दुसऱ्यांदा झाली आई; बाळाच्या नामकरण सोहळ्याला हजारोंची उपस्थिती

Sapna Choudhary becomes a mother for the second time: प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. सपनाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

Manasvi Choudhary

प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. सपनाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सपनाने ती दुसऱ्यांदा आई झाल्याची माहिती दिली नव्हती. यामुळेच सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

सपनाने नुकतंच दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे. ११ नोव्हेंबरला सपनाच्या दुसऱ्या मुलाचा नामकरण सोहळा पार पडला. सपनाच्या बाळाच्या नामकरण सोहळ्याला अनेक पंजाबी स्टार्स आणि चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. हजारोच्या संख्येने उपस्थिती सपनाच्या बाळाच्या नामकरण सोहळ्याला दिसली. याचदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सपना चौधरी पती वीर साहू सोबत बाळाला घेऊन स्टेजवर दिसत आहे. याचदरम्यान नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक बब्बू मानने तिच्या मुलाचे जोरदार स्वागत केले आहे. बाळाला आशीर्वाद देत नावाची घोषणा केली. सपनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव शाहशीर ठेवण्यात आलं आहे.

सपना चौधरी वीर साहूसोबत २०२०मध्ये गुपचूप लग्नबंधनात अडकली. यानंतर सपनाने एक मुलाला जन्म दिला होता.त्याचे नाव त्यांनी ‘पोरस’ ठेवले हे देखील सपनाने चाहत्यांना सांगितले नव्हते. आता सपनाने दुसऱ्या मुलाच्या जन्म दिला आहे. यामुळेच सपनाचे चाहते आनंदी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT