Youtuber Jyoti Malhotra Arrested Saam Tv
मनोरंजन बातम्या

Youtuber Arrested: प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक; पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा संशय

Youtuber Jyoti Malhotra Arrested: हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील प्रसिद्ध यूट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला देशद्रोह आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam

Youtuber Jyoti Malhotra Arrested: हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील प्रसिद्ध यूट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला देशद्रोह आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिचे राहते घर हिसारच्या घोडा फार्म रोडवर असून, ती ट्रॅव्हल व्ह्लॉगिंगच्या माध्यमातून सोशल मीडियावर सक्रिय होती. पोलीसांनी तिच्या विरोधात ठोस पुरावे गोळा केल्यानंतर ही कारवाई केली आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा गेल्या वर्षी लाहोरला गेली होती, जिथे तिने कथितपणे ISI च्या संपर्कात येऊन महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली. तिच्या संशयास्पद हालचालींवर सुरक्षा यंत्रणांनी दीर्घकाळ लक्ष ठेवले होते. तिच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील अपडेटवर सखोल विश्लेषण करण्यात येत आहे.

ज्योती मल्होत्रावर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा गंभीर आरोप आहे. तिच्यावर सोशल मीडियावरील उपस्थितीचा वापर करून तिने महत्वाची माहिती गोळा केली आणि ती पाकिस्तानला पाठवली, असा आरोप आहे. तिच्या या कारवायांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.

या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी ज्योती मल्होत्राच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

Tuesday Horoscope: पैशाच्या समस्या दूर होणार, या ५ राशींना घ्यावी लागणार काळजी? वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला तुम्ही पाहिलाय का? अनेक पर्यटकांच्या नजरेआड आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Accident News: बेंगळुरूहून मुंबईकडे निघाली ट्रॅव्हल्स बस, साताऱ्यात ड्रायव्हर बदलला; सारोळे उड्डाणपुलाजवळ येताच मोठा अपघात

Maharashtra News Live Update: करडे घाटात गोळीबार; सराईत गुन्हेगार विशाल काळेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT